Seating Arrangement Quiz 7 General Mental Ability Seating Arrangement Quiz REVISION Is Important Than Reading...!! 1 / 52 Category: Seating Arrangement 1. माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा. C ही वसाहत F, D आणि G या वसाहतींच्या दक्षिणेला वसली आहे. C आणि A या वसाहती E च्या पूर्वेला वसलेल्या आहेत आणि B ही वसाहत C आणि A च्या पश्चिमेला वसलेली आहे. A आणि B या वसाहती C या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेल्या आहेत. (CSAT - 2022) A) B ही वसाहत E या वसाहतीच्या पूर्वेला वसलेली आहे. B) G ही वसाहत B या वसाहतीच्या उत्तरेला वसलेली आहे. C) G ही वसाहत A या वसाहतीच्या पश्चिमेला वसलेली आहे. D) E ही वसाहत D या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेली आहे. स्पष्टीकरण : F, D व G च्या दक्षिणेला C आणि A हे C च्या दक्षिणेला V यावरुन – A व B च्या उत्तरेला C आणि C च्या उत्तरेला F, D व G असतील. G ही B च्या उत्तरेला आहे हे सिद्ध होते. 2 / 52 Category: Seating Arrangement 2. माझ्यासमोर विविध रंगाच्या सात खुर्च्या मांडल्या आहेत. पिवळ्या रंगाची खुर्ची निळ्या व जांभळ्या खुर्च्याच्या मध्ये आहे. हिरव्या रंगाची खुर्ची लाल व नारिंगी खुर्च्याच्या मध्ये आहे. पांढऱ्या रंगाची खुर्ची निळ्या खुर्चीच्या बाजूला आहे परंतु ती लाल किंवा जांभळ्या खुर्च्याच्या बाजूला नाही. ही माहिती सत्य मानून पुढीलपैकी निष्कर्षाचे/निष्कर्षांचे सर्वात उचित वर्णन निवडा. (a) निळी खुर्ची नेहमीच पांढऱ्या खुर्चीच्या बाजूला असणार. (b) पांढऱ्या खुर्चीच्या बाजूला नारिंगी खुर्ची असणे शक्य आहे. (c) जांभळ्या खुर्चीच्या बाजूला एकतर लाल किंवा नारिंगी खुर्ची असणे शक्य आहे. (ASO Mains - 2018) A) सर्व निष्कर्ष सत्य आहेत B) (a) खेरीज एकही नाही C) फक्त (b) D) जर (b) शक्य असेल तर (c) शक्य नाही स्पष्टीकरण : प्रश्नावरील conditions खुर्च्याची मांडणी खालीलप्रकारे शक्य आहे. (१) पांढरी, निळी, पिवळी, जांभळी, लाल, हिरवा, नारंगी किंवा (२) पांढरी, निळी, पिवळी, जांभळी, नारंगी, हिरवा, लाल किंवा (३) लाल, हिरवा, नारंगी, पांढरी, निळी, पिवळी, जांभळी वरील ३ वाक्यांवरून - नित्कर्ष a) - सत्य नित्कर्ष b) - सत्य नित्कर्ष c) - सत्य 3 / 52 Category: Seating Arrangement 3. दिलेली माहिती वाचून त्यासंदर्भातील चुकीचे विधान निवडा. A, B, C, D, E, F, G व H ही चित्रे समान अंतरावर वर्तुळाकार सभागाराच्या भिंतीवर प्रदर्शित केली आहेत. B हे G आणि D च्या दरम्यान आहे. H हे B च्या डावीकडे तिसरे आणि A च्या उजवीकडे दुसरे आहे. C हे A आणि G च्या दरम्यान प्रदर्शित केले असून B व E व्यासाच्या परस्परविरुद्ध नाहीत. (PSI Mains - 2016) A) G हे A व B च्या दरम्यान आहे पण E हे A व B च्या दरम्यान नाही. B) A व F च्या दरम्यान चित्र प्रदर्शित केलेले नाही. C) E हे G च्या डावीकडून तिसरे आहे. D) C व E ही व्यासाच्या परस्परविरुद्ध प्रदर्शित केलेली आहेत. स्पष्टीकरण : अटीनुसार....Clockwise = F - A - C - G - B - D - E - H 4 / 52 Category: Seating Arrangement 4. खालील माहिती वरुन प्रश्नाचे उत्तर द्या : अ) प्रत्येक रेडिओ स्टेशनची फ्रिक्वेन्सी कमीत कमी 10 सायकलने जास्त किंवा कमी आहे. ब) स्टेशन A हे B पेक्षा 10 सायकलने कमी आहे क) स्टेशन B हे C पेक्षा 20 सायकलने कमी आहे ड) स्टेशन D हे E पेक्षा 50 सायकलने जास्त आहे इ) स्टेशन E हे F पेक्षा 10 सायकलने जास्त आहे फ) स्टेशन F हे B पेक्षा 30 सायकलने कमी आहे C व E स्टेशनच्या मध्ये कोणती स्टेशन कार्य करतात ? (Forest Preliums - 2017) A) B आणि F B) D आणि A C) B आणि D D) B आणिA स्पष्टीकरण : According to conditions :- D ---(10)--- C ---(20)--- B ---(10)--- A ---(10)--- E ---(10)--- F 5 / 52 Category: Seating Arrangement 5. सना, दीपा, अनिता, सविता, अलिया, कविता, सुनिता आणि वनिता वर्तुळाकार टेबलाभोवती खेळ खेळतात. (a) अनिता आणि अलिया यांची तोंडे परस्परांसमोर आहेत. (b) सना आणि दीपा या अनिता आणि अलियाच्या शेजारी नाहीत. (c) वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे आणि अनिताच्या शेजारी आहे. (d) कविता ही अलियाच्या शेजारी नाही आणि सविता ही दीपाच्या शेजारी नाही. जर सविता आणि दीपा यांनी जागेची अदलाबदल केल्यास पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल. (PSI मुख्य 2019) A) दीपा ही कविताच्या समोर आहे. B) दीपा ही कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे. C) सविता ही कविताच्या उजवीकडे लागून आहे. D) सुनिता ही सविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे. स्पष्टीकरण : वरील अटीवरुन वर्तुळाकार बैठक व्यवस्था (anticlockwise) अलिया - दीपा / सविता - सुनिता - सना - सविता / दीपा - वनिता - कविता - अनिता जर सविता व दीपा यांनी स्वतःच्या जागांची आदलाबदल केल्यास - 2) सुनिता ही सविताच्या उजवीकडे 3) दीपा ही कविताच्या समोर 4) सविता ही कविताच्या उजवीकडे ही विधाने बरोबर आहे. 1) दीपा ही कविताच्या उजवीकडे लगत आहे हे विधान चुकीचे आहे. 6 / 52 Category: Seating Arrangement 6. काली, ऑर्थर, हेमा, फातिमा आणि लेना पाच सुगाव्यांच्या मदतीने खजिना शोध घेत आहेत. कालीला सर्व सुगावे लागले पण तिने शोध सर्वात शेवटी संपवला. लेना दुसऱ्या क्रमांकाला परतली पण तिचे दोन सुगावे चुकले. लेनापेक्षा हेमाचे दोन जास्त प्रश्न बरोबर होते पण तिने लेनाच्या नंतर शोध संपवला. ऑर्थर लेनापेक्षा अधिक वेगाने नव्हता. फातिमा हेमापेक्षा अधिक वेगात होती आणि तिचा फक्त एकच प्रश्न चुकला. जर वरील माहिती सत्य असेल तर पुढीलपैकी सत्य असणे शक्य नाही असे फक्त एक विधान निवडा. (Tax Asst. Mains - 2018) A) लेना तिसरी आली B) हेमा कालीपेक्षा वेगवान होती C) फातिमा सर्वप्रथम आली D) फातिमा ऑर्थरपेक्षा वेगवान होती स्पष्टीकरण : Time :- फातिमा < लेना < ऑर्थर < हेमा < काली किंवा फातिमा < लेना < हेमा < ऑर्थर < काली (Speed = Distance / Time) Speed :- फातिमा > लेना > ऑर्थर > हेमा > काली 7 / 52 Category: Seating Arrangement 7. A, B, C, D, E, F आणि G हे सर्वजण एका गोलाकार टेबलभोवती बसले आहेत. अ) F हा G च्या उजव्या बाजूला दुसरा आहे. ब) B हा F च्या शेजारी पण, G च्या शेजारी नाही. क) E हा C च्या शेजारी व G च्या उजव्या बाजूस चौथा. ड) D हा E आणि A यांच्या मध्ये बसलेला आहे. तर G च्या डाव्या बाजूस चौथ्या स्थानी कोण बसलेला असेल ? (MPSC Clerk - 2015) A) D B) A C) B D) C स्पष्टीकरण : हा प्रश्न आयोगाकडून रद्द केला गेला आहे पण जर आपण solve केला तर - Clockwise = C - E - B - F - A - G - D 8 / 52 Category: Seating Arrangement 8. एका स्पर्धेत जयाच्या वर्गातील सहा विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. पाच विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले. जयाचा क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकात सोळावा आहे, तर शेवटी असणाऱ्या स्पर्धकात एकोणतीसावा आहे. जयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. (MPSC Clerk Mains - 2017) A) 55 B) 4 C) 45 D) 56 स्पष्टीकरण : स्पर्धेत भाग न घेणारे - 6 पहिल्या फेरीत बाद - 5 जयाचा क्रम वरुन 16 वा व खालुन 29 वा स्पर्धेत राहिलेले विद्यार्थी = (16 + 29) – 1 = 44 एकूण विद्यार्थी = 44 + 6 + 5 = 55 9 / 52 Category: Seating Arrangement 9. जयचे मांजर अॅमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजराएवढेच आहे, जे अॅमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजरमालकाची जोडी निवडा. (CSAT - 2019) A) फिजा व जैनी B) जैनी व अॅमी C) वेणू व जैनी D) ॲमी व जय स्पष्टीकरण : मांजरांची आकारानुसार मोठेपणावरुन क्रम — जैनी > जय > फ़िज़ा = वेणु > अॅमी प्रश्नानुसार - आकाराने मोठे मांजर सर्वात वेगवान तर आकाराने लहान मांजर आज्ञाधारक आहे. सर्वात वेगवान = 'जैनी' चे मांजर सर्वात आज्ञाधारक = 'अॅमी' चे मांजर 10 / 52 Category: Seating Arrangement 10. राम, श्याम, सुरेश, चंदू आणि कमला हे पाच मित्र एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करुन क्रिकेट पाहत आहेत; अर्थात ते या नामक्रमाने बसलेले असतील असे नाही. केवळ श्याम हा राम आणि कमला यांच्यामध्ये, तर सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला लगतच आहे आणि चंदू रामच्या डाव्या बाजूला लागूनच आहे. ह्या माहितीच्या आधारावर खालील कोणते विधान निश्चितपणे सत्य आहे ? (ASO Mains- 2021) A) श्याम हा रामच्या डाव्या बाजूला आहे B) श्याम कमलाच्या उजव्या बाजूला आहे. C) राम सुरेशच्या डाव्या बाजूला दुसरा आहे D) चंदू कमलाच्या डाव्या बाजूला तिसरा आहे स्पष्टीकरण: सुरेश - कमला - श्याम - राम - चंदु 11 / 52 Category: Seating Arrangement 11. समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण ? (STI Mains - 2017) A) कबीर B) शिशिर C) समीर D) अमीर स्पष्टीकरण : उंचीनुसार - इतर सर्वजण > कबीर > अमिर 12 / 52 Category: Seating Arrangement 12. एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरुन 11 व्या क्रमांकावर व शेवटून 31 व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते ? (PSI Mains - 2016) A) 49 B) यापैकी एकही नाही C) 50 D) 48 स्पष्टीकरण : परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरून 11 व्या तर शेवटून 31 व्या क्रमांकावर आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थी = 8 उत्तीर्ण विद्यार्थी = (11 + 31) - 1 = 41 एकूण विद्यार्थी = 41 + 8 = 49 13 / 52 Category: Seating Arrangement 13. प्रियाचे प्राप्तांक नेहा पेक्षा जास्त आहेत. हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहेत. राहुलचे प्राप्तांक दिव्या पेक्षा कमी आहेत. नेहाचे प्राप्तांक हर्ष पेक्षा जास्त आहेत. दिव्याचे प्राप्तांक राकेश पेक्षा कमी आहेत. सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहेत ? (Forest Preliums - 2018) A) दिव्या B) नेहा C) हर्ष D) राहूल स्पष्टीकरण : Order according to Marks - प्रिया > नेहा > हर्ष = राकेश > दिव्या > राहूल 14 / 52 Category: Seating Arrangement 14. ऐशा व तिच्या नवऱ्याने काल त्यांचे शेजारी असलेल्या भिन्न लिंगी जोडप्यांना इफ्तार मेजवानीचे निमंत्रण दिले होते. ते सर्वजण वर्तुळाकार बसले होते व मध्यभागी अन्न ठेवले. ऐशाने तुम्हाला पुढील तथ्ये सांगितली आहेत. i) डॅनी एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो अनुच्या डावीकडे बसला आहे. ii) ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी माझ्या नवऱ्याच्या डावीकडे बसली आहे. iii) दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला बसला आहे जी राजाच्या डावीकडे बसली आहे. iv) मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली नाही. दिलेल्या पर्यायातून माझ्या नवऱ्याचे नाव निवडा. (STI Preliums - 2014) A) डॅनी B) इतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांच्या शेजारी बसल्या आहेत वा नाहीत याची माहिती आवश्यक आहे C) दिनू D) राजा स्पष्टीकरण : Clockwise = अनु - दिनू - ऐशा - डॅनी - इशा - राजा 15 / 52 Category: Seating Arrangement 15. P, Q, R, S, T, U, V आणि W हे मध्याकडे तोंड करुन वर्तुळाकार बसलेले आहेत. खालील विधाने लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर निवडा : (a) P हा T च्या उजवीपासून दुसरा आहे तसेच तो R आणि V चा सलग शेजारी आहे. (b) S हा P चा शेजारी नाही (c) V हा U चा शेजारी आहे. (d) 'Q' हा S आणि W च्या मध्ये नाही. 'W' हा U आणि s च्या मध्ये नाही. खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत ? (Combined Group B (Pre) - 2019) A) SW B) UV C) RV D) RP स्पष्टीकरण : Clockwise = U - V - P - R - T - W - S - Q 16 / 52 Category: Seating Arrangement 16. विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15 वा आणि दिनेश डावीकडून 18 वा आहे. जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात, तेव्हा मोहन उजवीकडून 20 वा ठरतो. तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणते ? (Forest Preliums - 2019) A) 23 वे B) 24 वे C) 20 वे D) 18 वे स्पष्टीकरण : Total Students = (18 + 20) – 1 = 37 दिनेश डावीकडून = 37 – (15 – 1) = 23 वा 17 / 52 Category: Seating Arrangement 17. सात मुली वर्तुळाकारात केंद्राकडे तोंड करुन बसल्या आहेत. तानी, वाणी, रइसा, कॅटी, जया, पन्ना आणि साथी त्यांची नावे असून ही यादी त्यांच्या बैठकीत क्रमानुसार आहे, असे नाही. तानी आणि जया वगळता कोणीतरी साथी व कॅटीच्या दरम्यान बसली आहे. पन्ना ही वाणीच्या डावीकडून दुसरी आहे आणि रइसा पन्नाच्या उजवीकडून पाचवी आहे. जया, पन्ना किंवा वाणी बरोबर जोडी करु शकते. जर जया व रइसा यांनी जागांची अदलाबदल केली तर पुढे दिलेल्या कोणत्या दोन मुली एकत्र काम करण्यासाठी जोडी करु शकणार नाहीत ? (ASO Mains - 2016) A) कॅटी - जया B) साथी - जया C) रइसा - पन्ना D) जया - तानी स्पष्टीकरण : Clockwise :- साथी - तानी - वाणी - जया (रईसा)- पन्ना - कॅटी - रईसा (जया) जया आणि रईस यांनी जागा बदलल्यास, जया - कॅटी, जया - साथी, आणि पन्ना - रइसा ही एकत्र काम करू शकणारी जोड्या आहेत. एकत्र काम करु न शकणारी जोडी :- जया - तानी 18 / 52 Category: Seating Arrangement 18. अकरा खेळाडू A, B, C, D, E, F, G, H, I, J आणि K त्यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत. a) D, जो F च्या डावीकडे लगत आहे. C च्या उजवीकडे दुसरा आहे. b) A, E च्या उजवीकडे दुसरा आहे, की जो एका टोकाला आहे. c) J, A आणि B चा लगतचा शेजारी आहे आणि G च्या डावीकडे तिसरा आहे. d) H, D च्या डावीकडे लगत आहे आणि । च्या उजवीकडे तिसरा आहे. तर रांगेच्या मध्यभागी कोण आहे ? (State Excise Preliums - 2017) A) G B) C C) I D) B स्पष्टीकरण : रांगेतील बैठक - E - K - A -J - B - (I) - G - C - H - D - F 19 / 52 Category: Seating Arrangement 19. A, B, C, D, E आणि F या सहा व्यक्ती एका ओळीत उत्तरेकडे तोंड करुन बसल्या आहेत. E च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी C बसला आहे. A आणि C यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसली आहे. B आणि D यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बसल्या आहेत. B हा A चा शेजारी आहे. F हा D चा शेजारी नाही. F च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसले आहे. (Mhada -2022) A) E B) C C) A D) B स्पष्टीकरण : F -C -B -A -E - D 20 / 52 Category: Seating Arrangement 20. पुढील माहिती वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निवडा. पाच मित्र संगणक प्रयोगशाळेत अर्धवर्तुळाकार टेबलावर बसलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे बसलेले आहेत. अ) 'C' च्या लगत उजवीकडे 'D' बसलेला आहे. ब) 'D' आणि 'E' च्या दरम्यान 'A' बसलेला आहे. क) 'E' च्या लगत डावीकडे 'B' बसलेला आहे. तर मधोमध कोण बसलेला आहे? (State Excise Mains - 2019) A) E B) B C) D D) A स्पष्टीकरण : अर्धवर्तुळाकार टेबलावरील संगणकासमोरील बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे - E - B - A - D - C 21 / 52 Category: Seating Arrangement 21. परमितने बियांचे रोझपेक्षा जास्त नमुने गोळा केले. रोझने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. नीलने परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले. ऋताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलापेक्षा कमी नमुने गोळा केले. सर्वात जास्त नमुने कोणी गोळा केले ? (PSI Mains - 2019) A) रोझ B) नील C) ऋता D) परमित स्पष्टीकरण : नमुने गोळा करणाऱ्यांचा क्रम = नील > ऋता > परमित > रोझ 22 / 52 Category: Seating Arrangement 22. एका प्रदर्शन कक्षात विविध रंगाच्या सात गाड्या उभ्या आहेत. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाड्यांच्या जवळ नाही. तर पुढीलपैकी कोणता / ते निष्कर्ष खात्रीने सत्य आहेत ? अ) पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्येच असणार. ब) जांभळ्या रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच एकतर लाल रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची गाडी असणार. क) नारंगी रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच पांढऱ्या रंगाची गाडी असणार. (STI Mains - 2017) A) अ खेरीज एकही नाही B) ब आणि क दोन्ही C) र्व D) अ खेरीज सर्व स्पष्टीकरण : conditions नुसार गाड्यांची मांडणी ‘नारंगी- पिवळी - निळी - जांभळी - लाल - हिरवी - पांढरी’ किंवा. ‘जांभळी - निळी - पिवळी - नारंगी - पांढरी - हिरवी - लाल’ 'पिवळी गाडी' कायम निळ्या व नारंगी गाडीच्या मध्ये असेल. 23 / 52 Category: Seating Arrangement 23. सहा वाहने एका ओळीत उभी केली आहे. उजव्या टोकाला असलेले वाहन निवडा. 1) उजव्या टोकाला असलेले वाहन डम्पर नाही. 2) मोटर बाइक व डम्पर एकमेकांच्या शेजारी नाहीत. 3) छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत. 4) लॉरी डाव्या बाजूचे 1 ले वाहन आहे... 5) टेम्पो हे उजवीकडून 2 रे वाहन आहे. (STI Mains - 2018) A) गाडी B) छोटी व्हॅन C) मोटर बाइक D) लॉरी स्पष्टीकरण: लॉरी(1)- 2 - 3 - 4 - टेम्पो(5) - 6 2, 3, 4 क्रमांकावर - (छोटी Van व गाडी), Dumper OR Dumper, (छोटी Van व गाडी), असे असू शकते. उजव्या टोकाला 6 व्या क्रमांकावर – 'मोटार बाईक' च येईल. 24 / 52 Category: Seating Arrangement 24. A, B, C आणि D हे मार्कच्या मळ्यात काम करतात. त्या सर्वांना मिळून त्याने एकूण वीस कलिंगडे दिली. त्यापैकी एकाला दोन मिळाली, दुसऱ्याला चार मिळाली, तिसऱ्याला सहा आणि चौथ्याला आठ मिळाली. A ला B पेक्षा जास्त कलिंगडे मिळाली. D ला C पेक्षा कमी कलिंगडे मिळाली. जर C ला D पेक्षा किमान दोन कलिंगडे जास्त मिळाली तर नेहमीच सत्य ठरेलच असे / अशी विधान / ने निवडा. (Combined Group C (Pre) - 2019) (a) A ला नेहमीच C पेक्षा जास्त कलिंगडे मिळतील (b) C ला कधीही A ला मिळाली तितकी कलिंगडे मिळणार नाहीत. (c) D ला त्याच्या बरोबर काम करणाऱ्या कोणाही व्यक्तिपेक्षा जास्त कलिंगडे मिळणे शक्य नाही (d) B ला नेहमीच A पेक्षा कमी कलिंगडे मिळतील. A) एकही नाही B) सर्व C) फक्त (d) D) एकतर (a) किंवा (b) स्पष्टीकरण : एकूण कलिंगडे = 20 कलिंगडाची संख्या :- A>B, D 25 / 52 Category: Seating Arrangement 25. जेव्हा लैला, लीला, ललिता व लीना वयानुसार उभ्या राहातात तेव्हा लैला लहान असल्याने पहिली उभी राहाते तर लीला शेवट पूरा करते. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहातात, ललिता सर्वांत ठेंगू असल्याने पहिली उभी राहाते तर लीला तिसऱ्या जागी येते. दोन्ही रांगांत लीना दुसऱ्या जागीच येते. लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा. (STI Mains - 2015) A) लीना B) लीला C) लैला D) ललिता स्पष्टीकरण : वयानुसार : लैला > लीना < ललिता < लीला उंचीनुसार : ललिता < लीना < लीला < लैला < लीलाच्या 26 / 52 Category: Seating Arrangement 26. A, B, C, D, E, F, G आणि H असे आठ मित्र वर्तुळाकार बसलेले आहेत. सर्वांची तोंडे वर्तुळ मध्याकडे आहेत. A, B च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी व F च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. D हा A किंवा B च्या बाजूला बसत नाही. C व G नेहमी एकमेकांजवळ बसतात. H हा D च्या बाजूला बसत नाही. C हा B च्या बाजूला बसत नाही. पत्ते खेळण्यासाठी त्यांनी चार जणांचा एक, असे दोन गट तयार केले. प्रत्येक गटात, एक सोडून एक असे सदस्य घेण्यात आलेत. खालीलपैकी कोणता समूह, अशा प्रकारे तयार झालेला गट असू शकणार नाही ? (STI Mains - 2015) A) HCBD B) AGEF C) CBDH D) AFDB स्पष्टीकरण : Clockwise = H - F - D - E - B - G - C - A 4 जणाचे एक आड एक गट केल्यास, पत्ते खेळण्यासाठी AGEF, CBDH आणि HCDB असे गट तयार होऊ शकतात.मात्र AFDB हा गट तयार होणार नाही. 27 / 52 Category: Seating Arrangement 27. सहा जणांच्या रांगेत D आणि C हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासून चौथा आहे. तर दोन टोकांना कोण आहेत ? (PSI मुख्य- 2014) A) F आणि C B) B आणि D C) C आणि A D) F आणि B स्पष्टीकरण :- अटीनुसार Seating Arrangement :- B - - - - A - - - - D - - - - E - - - - C - - - - F 28 / 52 Category: Seating Arrangement 28. १) बंडू मन्यापेक्षा उंच उडी मारतो. २) विली बंडूपेक्षा उंच उडी मारतो. ३) मन्या विलीपेक्षा उंच उडी मारतो. या तीन विधानांपैकी पहिली दोन विधाने सत्य असल्यास तिसऱ्या विधानाचे जास्तीत जास्त तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा. (MPSC Clerk - 2015 ) A) ते विधान बहुतेक सत्य असावे. B) ते विधान खात्रीने सत्य आहे. C) ते विधान खात्रीने असत्य आहे. D) पहिल्या दोन विधानातील माहिती तिसऱ्या विधानाची सत्यासत्यता ठरवण्याच्या दृष्टीने पुरेशी नाही. स्पष्टीकरण :समजा जर विधान (१) व (२) सत्य समजले तर ::- विली > बंडू > मन्या यावरुन विधान (3) - "मन्या विलीपेक्षा उंची उडी मारतो " हे विधान नक्कीच असत्य ठरते. 29 / 52 Category: Seating Arrangement 29. A, B, C, D, E आणि F ही मुले परस्परांकडून तोंडे करुन कानदुखीचा खेळ खेळण्यासाठी वर्तुळाकार बसलेली आहेत. आणि ती येथे दिलेल्या क्रमाने असतीलच असे नाही. A हे मुल F च्या समोर आणि C च्या डावीकडे बसले आहे E हे मुल D किंवा B च्या शेजारी नाहीत. B हे मुले A च्या शेजारी नाहीत. जर B हे मुल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात सर्वप्रथम कुजबुजणारं असेल तर पहिल्या फेरीच्या शेवटी कानात संदेश बोलण्याची संधी न मिळणारे मुल निवडा. (CSAT - 2022) A) फक्त D B) फक्त E C) एकतर D किंवा F D) फक्त F स्पष्टीकरण : Clockwise = F - E - C - A - D - B B हा डावीकडील मुलाच्या कानात प्रथम कुजबुजतो. याप्रमाणे, B हा F च्या कानात कुजबुजतो, F हा E च्या कानात, E हा C च्या कानात, C हा A च्या कानात, A हा D च्या कानात आणि D हा B च्या कानात कुजबुजतो. शेवटी कुजबुज करण्याची संधी D मिळेल. 30 / 52 Category: Seating Arrangement 30. मनू मानी, मंजू व माली यांनी अर्थविज्ञान व इतिहास चाचण्या दिल्या. पुढे दिलेली तथ्ये वापरुन इतिहासात सर्वांत कमी गुण मिळवणारी व्यक्ती निवडा : तथ्ये : - मनू एकटीच अर्थविज्ञानात अनुत्तीर्ण असून तिने इतिहासात सर्वाधिक गुण मिळवून त्याची कसर भरुन काढली आहे. - मानीने अर्थविज्ञानात मंजूवर मात केली आहे तर मंजू इतिहासात मानीपेक्षा उत्तम ठरली आहे. - मालीने तिची अर्थविज्ञानातील कामगिरी सुधारुन त्यात ती इतिहासापेक्षा एक क्रम वर आली आहे व मंजूला लागून वर आहे. (ASO Main - 2016) A) मनू B) माली C) मंजू D) मानी स्पष्टीकरण : Order - इतिहास :- मनु > मंजु > माली > मानी अर्थविज्ञान :- मानी > माली > मंजु > मनू 31 / 52 Category: Seating Arrangement 31. एका गोलमेज परिषदेत सहा व्यक्ती एका टेबलाच्या केंद्राकडे तोंड करुन बसलेले होते. त्यांची नावे आहेत अॅडी, बॉब, चार्ल्स, डग्लस, एलेना आणि फ्रेड अशी होती. बॉब हा चार्ल्स आणि एलेनाच्या मध्ये आणि अॅडीच्या समोर बसलेला आहे. डग्लस एलेनाच्या डावीकडे बसलेला आहे. डग्लसच्या डाव्या बाजुला बसलेली तिसरी व्यक्ती कोण आहे ? (Mhada - 2022) A) अॅडी B) फ्रेड C) चार्ल्स D) बॉब स्पष्टीकरण : Clockwise = अॅडी - फ्रेड - चार्ल्स - बॉब - एलेना - डग्लस 32 / 52 Category: Seating Arrangement 32. फोटो काढण्यासाठी 5 मुली एका बाकावर बसलेल्या आहेत. लताच्या लगेचच डावीकडे सविता बसलेली आहे. कविताच्या लगेचच डावीकडे अमृता बसलेली आहे. अमृताच्या लगेचच डावीकडे भाविका बसलेली आहे तर मध्यभागी कोण बसलेले आहे ? (Tax Asst. Mains - 2019) A) कविता B) अमृता C) लता D) सविता स्पष्टीकरण : लता - सविता - कविता - अमृता - भाविका 33 / 52 Category: Seating Arrangement 33. सात व्यक्तींतून चार जणांचा गट तयार करायचा आहे. या व्यक्तीचा तपशील पुढीलप्रमाणे, यात M व N या स्त्रिया व A, B, C, D व E हे पाच पुरुष आहेत. जर व्यक्ती B सुध्दा निवडली गेली, तर A ला गटात असणे आवडणार नाही. B व E दोघांना एकत्र गटात निवड झालेली आवडेल. जर D गटात असेल, तरच N ला त्यात असणे आवडेल. जर C ची निवड झाली, तर तिला D गटात असणे आवडणार नाही. जर गटात D सुध्दा असेल, तर A ला गटात असणे आवडेल. जर गटात तो असेल, तर त्यात M ची निवड व्हायला हवी असा C चा आग्रह आहे. दिलेल्या पर्यायांतील सर्वात समाधानी गट निवडा. (State Excise Mains - 2017) A) B, E, N, C B) A, D, M, E C) M, C, B, E D) A, D, M, C 34 / 52 Category: Seating Arrangement 34. A, B, C, D, E, Fहे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत. E हा D च्या डाव्या बाजूस आहे. C हा A आणि B च्या मध्ये आहे. F हा E आणि A च्या मध्ये आहे. तर B च्या डाव्या बाजूला कोण आहे ? (PSI Preliums - 2014) A) C B) D C) A D) E स्पष्टीकरण : Clockwise = C - B - D - E - F - A 35 / 52 Category: Seating Arrangement 35. A, B, C, D, E आणि F एका ओळीत उभे आहेत. B हा F आणि D च्या मध्ये उभा आहे. E हा A आणि C च्या मध्ये उभा आहे. A हा F किंवा D च्या लगेच पुढे नाही. C हा D च्या लगेच पुढे नाही. F हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे ? (Combined Group B (Pre) - 2022) A) B आणि C B) B आणि D C) B आणि E D) B आणि A स्पष्टीकरण : C - F - B - D - E - A 36 / 52 Category: Seating Arrangement 36. आठ मित्र क्रिकेटचा सामना पाहात पुढीलप्रमाणे बसले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इंद्रदेव व गणेश यांच्यामध्ये आदित आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. इंद्रदेव हा धनराजच्या शेजारी आहे. अंजली कोणत्या तरी एका कडेला आहे तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत ? (STI Mains - 2019) A) 3 B) 1 C) 4 D) 2 स्पष्टीकरण : अंजली - हुसेन - गणेश - आदित - इंद्रदेव - धनराज -अशोक - भरत 37 / 52 Category: Seating Arrangement 37. गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभी आहेत आणि गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत, तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत ? (Tax Asst. Pre - 2017) A) 27 B) 30 C) 28 D) 29 स्पष्टीकरण : 8 मुले — 3 मुले — गोपाळ — 5 मुले — 12 मुले एकूण मुले = 8 + 3 + गोपाळ + 5 + 12 = 29 मुले 38 / 52 Category: Seating Arrangement 38. काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. V ही व्यक्ती An च्या शेजारी आणि S ही व्यक्ती G च्या शेजारी आहे. G ही व्यक्ती Aj च्या बरोबर नाही. Aj बाकाच्या डाव्या टोकाला आणि S बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. V ही व्यक्ती An च्या उजवीकडे आणि Aj च्या उजवीकडे आहे. V आणि S सोबतीने बसल्या आहेत. जर G आणि V यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले विधान निवडा. (Combined Group B (Pre) - 2022) A) त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहीत नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाही. B) V टोकाच्या स्थानावर आहे. C) G मधल्या स्थानावर आहे. D) An दोनापैकी एक टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे. स्पष्टीकरण : Aj — An — V — S — G Aj — An —(G)— S —(V) 39 / 52 Category: Seating Arrangement 39. काही मित्र कबड्डी पाहत आहेत. हाना 308 या आसनावर बसली आहे. हानाच्या उजव्या बाजूला 311 व्या आसनावर मंजू बसली आहे. हानाच्या डाव्या बाजूच्या आसनावर गगन बसला आहे. अब्बास गगनच्या डाव्या बाजूला बसला आहे. अब्बास व गगन यांच्या दरम्यानच्या तीन आसनांवर या सर्वांना अपरिचित असलेले लोक बसले आहेत. अब्बास बसलेल्या आसनाचा क्रमांक दिलेल्या पर्यायातून निवडा. (PSI Mains- 2020) A) 302 B) 313 C) 314 D) 303 स्पष्टीकरण : अब्बास(303) —|—|—|— गगन — हाना(308) —| —| —मंजु(311) 40 / 52 Category: Seating Arrangement 40. खालील विधाने तपासून पाहा : अ) एक तर रमेश व किरण एकाच वयाचे आहेत किंवा रमेश किरणपेक्षा वयाने मोठा आहे. ब) एक तर सौरभ व संग्राम एकाच वयाचे आहेत किंवा संग्राम सौरभपेक्षा वयाने मोठा आहे. क) सौरभपेक्षा किरण वयाने मोठा आहे. वरील विधानांतून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतो ? (PSI Preliums - 2014) A) सौरभपेक्षा संग्राम वयाने मोठा आहे. B) किरण व संग्राम एकाच वयाचे आहेत. C) सौरभपेक्षा रमेश वयाने मोठा आहे D) किरणपेक्षा रमेश वयाने मोठा आहे. स्पष्टीकरण : Option (A) नुसार रमेश ≥ किरण Option (B) नुसार संग्राम ≥ सौरभ Option (C) नुसार किरण > सौरभ रमेश ≥ किरण > सौरभ 41 / 52 Category: Seating Arrangement 41. अनिल, संजय, सुनिल, दीपक, महेश, प्रशांत आणि सुरेश ही मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल, दीपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहे, तर दीपक कोठे बसला आहे ? (तांत्रिक-पुर्व-2021) A) अनिल व संजय यांच्यामध्ये B) सुनिल व संजय यांच्यामध्ये C) सुनिल व प्रशांत यांच्यामध्ये D) संजय व महेश यांच्यामध्ये स्पष्टीकरण: सुरेश - महेश - प्रशांत - संजय - दीपक - सुनिल - अनिल 42 / 52 Category: Seating Arrangement 42. पुढील माहिती काळजीपूर्वक अभ्यासून दिलेल्या माहितीशी विसंगत असलेला पर्याय निवडा. A, B, C, D, E, Fव G सूर्यास्त पाहण्यासाठी ओळीत बसलेले आहेत पण ते दिलेल्या क्रमानेच असतील असे नाही. F व A यांच्या दरम्यान फक्त तीन व्यक्ति आहेत. F व A ओळीच्या अगदी टोकांना बसलेले नाहीत. Aव G यांच्या दरम्यान फक्त दोन व्यक्ति आहेत. E ही व्यक्ति A किंवा F ची लगतची शेजारी नाही. E ही व्यक्ति B च्या उजवीकडून तिसरी आहे. B ही व्यक्ति A ची लगतची शेजारी नाही. E ही व्यक्ति C ची लगतची शेजारी नाही. (MPSC Clerk Mains - 2018) A) F ही व्यक्ति एक तर G च्या डावीकडे किंवा उजवीकडे असू शकते. B) जर A व E यांनी स्वतःच्या जागांची अदलाबदल केली तर A ही व्यक्ति C च्या डावीकडे तिसरी असेल. C) G व B हे F चे लगतचे शेजारी आहेत. D) H ने E व G यांच्या मधली जागा घेतली, तर C ही व्यक्ति H च्या उजवीकडे चौथी असेल. स्पष्टीकरण : B - F - G - E - D - A -C F ही व्यक्ती एकतर G च्या डावीकडे किंवा उजवीकडे असू शकते → ( असत्य ) 43 / 52 Category: Seating Arrangement 43. चार विद्यार्थ्यांची उंची W, X, Y, Z अशी आहे आणि 2X = W + Z, 2W = X + Y, 2Y = W त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल ? (STI Preliums - 2013) A) Y < W < X < Z B) W < Y < X < Z C) Z < X < W < Y D) X < Z < Y < W स्पष्टीकरण : Y = 1 समजून value put करा व solve करा. 44 / 52 Category: Seating Arrangement 44. खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे. 1) दक्षिणेकडे तोंड असलेल्या पाच व्यक्ती A, B, C, D आणि E, आणि उत्तरेकडे तोंड करुन बसलेल्या पाच व्यक्ती M, N, O, P आणि Q परस्परांसमोर दोन समांतर रांगांमध्ये बसल्या आहेत. II) E हा O च्या समोर आहे, जो M च्या उजवीकडे लागून आहे. III) C आणि N एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत. IV) B, जो D च्या डावीकडे लागून आहे, Q च्या समोर आहे. V) M हा रांगेच्या एका टोकाला आहे. VI) P, जो Q च्या डावीकडे लागून आहे, D च्या समोर आहे. जर B हा E च्या जागेवर गेला, E हा Q च्या जागेवर गेला आणि Q हा B च्या जागेवर गेला, तर O च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असेल ? (Combined Group B (Pre) - 2020) A) E B) P C) D D) Q स्पष्टीकरण : C — E(B) — D — B(Q) — A - -{दक्षिणेकडे तोंड} M— — O — P — Q(E) — N - - {उत्तरेकडे तोंड} 45 / 52 Category: Seating Arrangement 45. संयुक्त कुटुंबातील चार भावंडांना मिठाई वाटून घ्यायची आहे. सर्वात धाकट्याला जास्त मिठाई द्यायचे त्यांनी ठरविले. स्वाती, गणेशपेक्षा दोन महिन्यांनी मोठी आहे, जो नीलापेक्षा तीन महिन्यांने नी लहान आहे. काशी, गणेशपेक्षा एक महिन्याने मोठी आहे. मिठाईचा जास्त वाटा कोणाला मिळेल ? (AMVI - 2020) A) नीला B) काशी C) गणेश D) स्वाती स्पष्टीकरण:उदाहरणातील अटीनुसार वयातील मोठेपणा...... वयानुसार = निला > स्वाती > काशी > गणेश वयाने सर्वात लहान गणेश म्हणून सर्वात जास्त मिठाई गणेश ला 46 / 52 Category: Seating Arrangement 46. एका रांगेमध्ये 'A' डाव्या बाजूने 11 व्या स्थानावर आहे आणि 'B' उजव्या बाजूने 10 व्या स्थानावर आहे. जर 'A' आणि 'B' यांच्या जागांची अदलाबदल केली तर 'A' डाव्या बाजूने 18 व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये 'A' आणि 'B' खेरीज किती व्यक्ती असतील. (CSAT - 2018) A) 26 B) 24 C) 27 D) 25 स्पष्टीकरण : रांगेतील एकूण व्यक्ती = (10+18) - 1 = 27 A व B शिवाय इतर व्यक्ती = 27 - 2 = 25 47 / 52 Category: Seating Arrangement 47. लिलीकडे रया आणि डेव्ह यांच्या एकूण पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. रया आणि कार्ल या दोघांकडे असलेल्या एकूण पुस्तकांपेक्षा लिलीकडे कमी पुस्तके आहेत. सोनाकडे कार्लपेक्षा अधिक पुस्तके आहेत. परीकडे लिलीपेक्षा जास्त पुस्तके आहेत. वरील माहितीच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा. (MPSC Clerk Mains - 2018 ) A) रयाकडे लिलीपेक्षा कमी पुस्तके आहेत. B) डेव्हकडे निश्चित सर्वात कमी पुस्तके आहेत. C) कार्लकडे डेव्हपेक्षा जास्त पुस्तके आहेत. D) कोणत्या व्यक्तीकडे सर्वात जास्त पुस्तके आहेत हे निश्चित करण्यासाठी पुरेशी माहिती नाही. स्पष्टीकरण : लिली > रया + डेव्ह लिली< रया + डेव्ह सोना > कार्ल परी > लिली 1) प्रश्नातील माहितीवरून लिलीकडे रयापेक्षा जास्त पुस्तके आहेत हे माहित होते, परंतु राया आणि डेव्ह यांच्यातील तुलना दिलेली नाही. त्यामुळे "निश्चितपणे सर्वात कमी पुस्तके डेव्हकडे आहेत" असे म्हणता येणार नाही. 48 / 52 Category: Seating Arrangement 48. पुढे दिलेल्या अक्षरसाखळीचा उपयोग करुन F अक्षराच्या उजवीकडे लागून असलेल्या आणि C अक्षराच्या डावीकडे दुसऱ्या असलेल्या अक्षराच्या मधोमध असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या असणाऱ्या अक्षराच्या डावीकडे लागून असलेल्या अक्षराच्या उजवीकडून दुसरे असलेले अक्षर निवडा: A B C D E F G H (AMVI - 2020) A) H B) G C) F D) B स्पष्टीकरण : A B C D E F G H F अक्षराच्या उजवीकडे लागून असलेल्या(G) आणि C अक्षराच्या डावीकडे दुसऱ्या असलेल्या अक्षराच्या(A) मधोमध असलेल्या अक्षराच्या(D) उजवीकडून तिसऱ्या असणाऱ्या अक्षराच्या(G) डावीकडे लागून असलेल्या अक्षराच्या(F) उजवीकडून दुसरे असलेले अक्षर= H 49 / 52 Category: Seating Arrangement 49. अंकिता ही संगितापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरिष हा श्याम आणि संगितापेक्षा लहान आहे. संगिता ही श्यामपेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे ? (ASO Mains - 2017) A) संगिता B) गिरिश C) शिरिष D) श्याम स्पष्टीकरण : अंकिता > गिरीश > संगिता > श्याम > शिरिष 50 / 52 Category: Seating Arrangement 50. प्रविण, अजय, राहूल, सोहम आणि तनिश यामध्ये प्रविण उंचीने दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सोहम हा सर्वात ठेंगू व्यक्तीपेक्षा उंच आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. ( उंचीने) जर त्यांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास मध्यभागी कोण असेल ? अ) सर्वांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास अजय हा तीन क्रमाकांने सोहमच्या वर आहे. ब) राहूल हा सोहमपेक्षा उंच आहे परंतु प्रविणपेक्षा बुटका आहे. क) तनिश सर्वात बुटका नाही. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माहिती पुरेशी आहे ते सांगणारा पर्याय निवडा. (STI Mains - 2018) A) फक्त ब B) फक्त अ आणि ब C) फक्त ब आणि क D) फक्त ब किंवा अ आणि क दोन्ही मिळून 51 / 52 Category: Seating Arrangement 51. एका रांगेत अनुजाच्या डाव्या बाजुला चौथ्या क्रमांकावर असलेल्या सीमाचा उजवीकडून दहावा व डावीकडून चौदावा क्रमांक आहे तर अनुजाचा रांगेतील क्रमांक कोणता ? (MPSC Clerk - 2013) A) उजवीकडून पाचवा B) डावीकडून सोळावा C) उजवीकडून सहावा D) डावीकडून सहावा 52 / 52 Category: Seating Arrangement 52. केट ही युगपेक्षा वयाने तीनपट मोठी आहे. मिनी ही वयाने झरिनच्या निम्मे आहे. युग मिनीपेक्षा वयाने मोठा आहे. सत्य अनुमानाची निवड करा. (Tax Asst. - 2016) A) वरील सर्व अनुमाने सत्य आहेत B) केट कदाचित झरिनपेक्षा वयाने लहान असेल C) युग वयाने झरिनपेक्षा मोठा आहे D) केट वयाने झरिनपेक्षा मोठी आहे स्पष्टीकरण : केटचे वय = 3 x युग yrs मात्र युग > मिनी मिनी = झरीन/2 Therefore - केट > युग > झरीन > मिनी केट वयाने झरीनपेक्षा मोठी आहे. Loading...MPSC is all about Patience.... Your score is LinkedIn Facebook Twitter BACK HOME PAGE