100

Economics

राष्ट्रीय उत्पन्न

1 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

1. राष्ट्रीय उत्पन्नाची खाती खालील गोष्टी समजून घेण्यास मदत करतात.
अ) चार्टर्ड अकौंटंटचा व्यवसाय
ब) अर्थव्यवस्थेच्या एकूण प्रदानाची कामगिरी
क) विश्लेषणात्मक प्रारूपाच्या बांधणीसाठीची चौकट.
(राज्यसेवा Mains, मे - 2022)

2 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

2. केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवाक्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही?
(राज्यसेवा Mains-2019)

3 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

3. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी/मापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही?
(राज्यसेवा Mains - 2013)

4 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

4. विकासाच्या अर्थशास्त्रात उत्पन्नाच्या असमानतेचे विश्लेषण करणाज्या वक्राला ........... असे संबोधले जाते.
(Forest Mains 2019)

5 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

5. भारत सरकार द्वारा प्रा. पी.सी. महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले?
(ASO पूर्व - 2014)

6 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

6. आर्थिक वृद्धीची' पुढील संकल्पना कुणी मांडलेली आहे?
"आर्थिक वृद्धी म्हणजे बचत दर आणि लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे दीर्घकाळात क्रमाने आणि स्थिरपणाने होणारा बदल होय."
(राज्यसेवा Mains, मे - 2022)

7 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

7. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खालील परिमाणांपैकी कोणत्या परिमाणात देशाच्या नागरिकांनी विदेशातून कमावलेली प्राप्ती समाविष्ट केली जाते?
(Forest Mains - 2018)

8 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

8. - - - - - म्हणजे एका वर्षात उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचा एकूण बाजारभाव होय.
( Agri.पूर्व - 2012)

9 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

9. सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने प्रथम मांडली?
(Forest Mains - 2019)

10 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

10. स्थूल देशांतर्गत उत्पादन (G.D.P.) चा अर्थ आहे.
a) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (G.N.P.).
b) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन (N.N.P.).
c) एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा
d) सरकारी उत्पन्न.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत?
(STI Pre. - 2016)

11 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

11. भारताचे GNP (सकल राष्ट्रीय उत्पन्न) हे खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजले जाते?
(Agri Pre. - 2018)

12 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

12. देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशांत कमावलेले उत्पन्न, वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय?
(MPSC main - 2017)

13 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

13. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न' यात खालील घटक आहेत:
(Combine Group B (Pre.) - 2018)

14 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

14. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते?
(राज्यसेवा Mains-2019)

15 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

15. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
(a) उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांची निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते.
(b) उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते.
(c) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो.
(राज्यसेवा Mains - 2014)

16 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

16. बाजार किंमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन यांमधील फरक हा खालीलपैकी एका घटकामुळे दिसून येतो :
(राज्यसेवा Mains - 2020)

17 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

17. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे?
(a) खर्च पद्धत
(b) उत्पन्न पद्धत
(c) उत्पादन पद्धत
(d) प्रवाह निधी पद्धत
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा Mains - 2013)

18 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

18. NNP* = GNP - Dm - Dn हे सातत्यपूर्ण निव्वळ राष्ट्रिय उत्पादनाचे समीकरण आहे. या समीकरणामध्ये Dm आणि Dn काय आहेत?
(राज्यसेवा Mains - 2012)

19 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

19. गिनी चा गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो?
(राज्यसेवा Mains - 2017)

20 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

20. 2006-07 साली भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा किती होता?
(PSI Mains - 2011)

21 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

21. उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणी मांडली होती?
(राज्यसेवा Mains - 2020)

22 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

22. भारतात राष्ट्रीय उत्पन्ना विषयीचे अंदाज ....... कडून सादर केले जातात.
(PSI Mains - 2011)

23 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

23. खालीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत ?
अ. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) होय.
ब. उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो, परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो. त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात (GNP) केला जातो.
क. प्रति माणसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शविते .
(राज्यसेवा पूर्व - 2020)

24 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

24. हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
(a) 1990 मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन ही संकल्पना विकसित करण्यात आली.
(b) या संकल्पनेत मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि कमी झालेल्या नैसर्गिक साधन सामुग्रीची होणारी किंमत या घटकाचा विचार केला जातो.
(c) सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनांचे मोजमापन सुरू केले.
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत?
(राज्यसेवा Mains - 2017)

25 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

25. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही?
अ. उत्पादन पद्धती
ब. आयात-निर्यात पद्धती
क. उत्पन्न पद्धती
ड. खर्च पद्धती
(Combine Group C(Pre)- 2018)

26 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

26. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
a) स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1948 मध्ये नेमली.
b) प्रोफेसर डी.आर. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते.
(STI Pre.- 2014)

27 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

27. खालील विधाने विचारात घ्या.
(a) उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते.
(b) उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते.
(c) केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायजेशन तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा Mains - 2017)

28 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

28. खालीलपैकी कोणती संज्ञा अशा वक्राचे वर्णन करते की, जो वक्र दोन प्रकाराच्या वस्तुंची अशी मिळकन (combination) दर्शवतो की ज्यामध्ये त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादन घटकांचा संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो :
(Forest Mains 2019)

29 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

29. स्थूल देशांतर्गत उत्पादनाबद्दल खालील दृष्टीकोन आहेत :
अ) हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह.
ब) हा एकूण प्राप्तीचा किंवा उत्पन्नाचा प्रवाह.
क) हा एकूण खर्चाचा प्रवाह.
(राज्यसेवा Mains - 2022)

30 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

30. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना (NSSO) ने बेरोजगारीबाबत खालील संकल्पना विकसित केल्या आहेत.
a) सामान्य स्थिती
b) चालू साप्ताहिक स्थिती
c) चालू दैनंदिन स्थिती
d) चालू वार्षिक स्थिती
(STI Main - 2014)

31 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

31. उत्पादन एककाद्वारे बाजारभावानुसार स्थूल मूल्यवर्धित उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पादनमूल्यातून खालील गोष्टी/गोष्ट वजा कराव्या लागतील.
अ) मध्यवर्ती वापराचे मूल्य
ब) गुंतवणूकीचे मूल्य
क) व्यक्तिगत उत्पन्न
(राज्यसेवा Mains - 2022)

32 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

32. हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे (GNI) मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत?
अ. राष्ट्रीय उत्पन्न
ब. नैसर्गिक संसाधनामध्ये घट
क. पर्यावरणीय ऱ्हास
(राज्यसेवा पूर्व - 2018)

33 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

33. खालीलपैकी कोणती संकल्पना “'राष्ट्रीय उत्पन्न" या संकल्पनेशी संबंधित आहे?
(Combined Group 'C' Pre. April - 2022)

34 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

34. खाली नमूद दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) बाजार मुल्य वर्षभरात वाढले असले तरी घसारा आकारण्यात येतो.
ब) घसारा आर्थिक स्रोत नाही.
(करसहाय्यक - 2015)

35 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

35. समजा 2012 मध्ये उपभोग खर्च 12 कोटी, गुंतवणूक खर्च 8 कोटी व शासनाने प्रकल्पांवर 10 कोटी खर्च केले तसेच निर्यात 5 कोटीची आणि आयात 6 कोटींची होती. तर स्थूल देशांतर्गत उत्पादन किती असेल ?
(राज्यसेवा Mains - 2014)

36 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

36. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही?
(ASO Pre. - 2016)

37 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

37. (a) जानेवारी 2015 मधे केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाने स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी नवी श्रेणी जाहीर केली.
(b) यानुसार आधारवर्ष आधीच्या 2004-05 पासून 201011 असे बदलण्यात आले आहे.
(Forest Mains-2018)

38 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

38. कोणत्या राज्यामध्ये 2005-06 ते 2010-11 या काळात दरडोई निव्वळ घरेलू उत्पादन सर्वात कमी होते ?
(ASO Mains - 2018)

39 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

39. पुढील कोणते विधान योग्य आहे?
a) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था 2005-06 चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते.
b) पूर्वी 2000-2001 आधारभूत वर्ष होते.
(STI Pre. - 2014)

40 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

40. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजतांना कोणता कालखंड हे 'वर्ष' मानले जाते?
(STI Pre. - 2016)

41 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

41. नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या कोणत्या फेरीनुसार भारताची दारिद्यरेषेखालील लोकसंख्या 27.8 प्रतिशत होती?
(PSI Mains - 2011)

42 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

42. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) नॅशनल सॅम्पल सर्वे ऑरगनायझेशनची स्थापना 1950 मध्ये केली गेली व पुर्नघटन 1970 मध्ये झाले.
ब) संस्थेच्या वार्षिक तकनीकी पुस्तिकेत - सर्वेक्षणा - या सर्व सर्वेक्षणांच्या निकालांचा सारांश दिलेला असतो.
(STI Mains - 2013)

43 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

43. सन 1949 च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत सुचविली?
(a) निव्वळ उत्पादन पद्धती
(b) निव्वळ उत्पन्न पद्धती
(c) खर्च पद्धती
(d) दरडोई खर्च पद्धती
(राज्यसेवा Mains - 2015)

44 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

44. खालील विधाने विचारात घ्या.
अ. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली.
ब. या समितीमध्ये प्रा. पी. सी. महालनोबिस, प्रा. डी. आर. गाडगीळ आणि प्रा. व्ही. के. आर. व्ही. राव यांचा समावेश होता.
क. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला.
वर दिलेल्या विधांनापैकी कोणते विधान/कोणती विधाने चूकीची आहे/आहेत?
(Combine ‘B’ - 2021)

45 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

45. देशांतर्गत हरित सकल उत्पादन (Green GDP) संबंधी विचार करता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनांचा वापर करा.
ब) अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनांचा पर्याप्त, कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करा.
क) अर्थव्यवस्थेच्या वाढी करीता संसाधनांचे शोषण करा.
ड) अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधने संपेपर्यंत वापरा.
(राज्यसेवा Mains - 2022)

46 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

46. नैसर्गिक मत्तेच्या मौद्रिक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो ऱ्हास झाला असेल त्याचे समायोजन एकूण राष्ट्रिय उत्पन्नाच्या आकड्याशी करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?
(राज्यसेवा Mains - 2013)

47 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

47. पुढील तीन विधानांचा विचार करा. त्यातील कोणते योग्य आहे?
अ) भारताची जी.डी.पी. वाढ 2009-10 च्या 8.4% पासून 2011-12 च्या 6.9 % पावेतो व सुधारीत अंदाजांनुसार 6.5 % पावेतो कमी झाली आहे.
ब) सन 2011-12 च्या उद्योग क्षेत्रातील मंदी ह्या जी.डी.पी. घसरणीस दुय्यम कारण आहे
क) भारतातील निर्यातीस परदेशातील मागणी घटणे प्रामुख्याने या जी.डी.पी. घसरणीस कारणीभूत आहे.
(STI Mains - 2013)

48 / 48

Category: राष्ट्रीय उत्पन्न

48. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील कोणत्या दोन मुख्य अडचणी आहेत?
(राज्यसेवा Mains - 2020)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top