0%
23

Science

Physics ( भौतिकशास्र )

1 / 241

Category: भौतिकशास्र

1. C हा प्रकाशाची हवेमधील वेग असून 1.5 हा काचेचा हवासापेक्ष अपवर्तनांक असल्यास प्रकाशाची काचेमधील वेग किती ?
(PSI Pre. 2011)

2 / 241

Category: भौतिकशास्र

2. फ्रेन्च शास्त्रज्ञ मेरी क्युरी (Curie) ह्यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला ? 
      (Rajyaseva Pre. 2012) 

3 / 241

Category: भौतिकशास्र

3. प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
अ) प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर
ब) प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर
क) प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर
ड) प्रकाशाच्या अपस्करण तत्वावर
      (Rajyaseva Pre. 2019)

4 / 241

Category: भौतिकशास्र

4. सोनार (साऊंड नेव्हीगेशनल श्रेणी) तंत्र - - - - - - - -  यासाठी वापरले जाते. 
    (Rajyaseva Pre., 2022)

5 / 241

Category: भौतिकशास्र

5. डी.बी.टी. (DBT) हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे ?
(Rajyaseva Pre. 2017)

6 / 241

Category: भौतिकशास्र

6. दोन समतल आरशांमध्ये एक मांजर बसली आहे, जर दोन समतल आरशांमधील कोन 30 अंश असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील ? 
    (Rajyaseva Pre., 2022) 

7 / 241

Category: भौतिकशास्र

7. पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/ने सत्य आहे/त?
अ) गुरुत्वबल हे फक्त आकर्षण बल आहे.
ब) केंद्रकीय बल हे आकर्षण बल व प्रतिकर्षण बल असू शकते.
क) स्थिरविद्युत बल हे आकर्षण व प्रतिकर्षण बल असू शकते.
ड) गुरुत्व बल हे फक्त प्रतिकर्षण बल असते.
(Rajyaseva Pre. 2012)

8 / 241

Category: भौतिकशास्र

8. जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ़ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे : 
    (Rajyaseva Pre. 2020)

9 / 241

Category: भौतिकशास्र

9. खालीलपैकी कोणता ग्रह नाही ?
(Combined 'C' Pre. 2019)

10 / 241

Category: भौतिकशास्र

10. टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावर अचल स्थितीत राहते. ही बाब म्हणजे न्यूटनच्या गतीविषयक - - - - - - - - नियमाचे उदाहरण होय.
(MES Ele & Mech. 2014)

11 / 241

Category: भौतिकशास्र

11. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण
(STI Pre. 2013)

12 / 241

Category: भौतिकशास्र

12. इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासून बनविलेले असतात ?
(Asst. Pre. 2013)

13 / 241

Category: भौतिकशास्र

13. पुढीलर्पैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून "फूल्स गोल्ड" / "मूर्खांचे सोने' असे ओळखले जाते?
(STI Pre. 2015)

14 / 241

Category: भौतिकशास्र

14. डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास तो आपणास -
      (Rajyaseva Pre. 2016)

15 / 241

Category: भौतिकशास्र

15. मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उदभवणाऱ्या दोषाला- - - - - - - -  म्हणतात.
      (PSI Pre. 2016)

16 / 241

Category: भौतिकशास्र

16. एका 257 g वजनाच्या चेंडुचा वेग 257 m/s असेल तर त्याची तरंगलांबी - - - - - - - -  m इतकी असते. 
      दिले गेले आहे (h = 6.626 x 10-34 J/S) 
      (Combined 'C' Pre. 2018)

17 / 241

Category: भौतिकशास्र

17. पृथ्वीच्या भुपृष्ठावर अॅल्युमिनिअम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो ?
(ASO Pre. 2015)

18 / 241

Category: भौतिकशास्र

18. उपचारात्मक भिंगाची शक्ती + 2.5 डायोप्टर असल्यास त्यांचे नाभीय अंतर - - - - - - होते. 
      (Clerk Mains 2017) 

19 / 241

Category: भौतिकशास्र

19. 1 कॅलरी = - - - - - - - - ज्यूल.
(Clerk Mains 2019)

20 / 241

Category: भौतिकशास्र

20. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?
(Rajyaseva Pre. 2017)

21 / 241

Category: भौतिकशास्र

21. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो ? 
    (Combined B Pre. 2022)

22 / 241

Category: भौतिकशास्र

22. खालीलपैकी कोणती सदीश राशी नाही?
    (Forest. Pre. 2012)

23 / 241

Category: भौतिकशास्र

23. दोन समान रोधक प्रथम सरळ जोडणीमध्ये व नंतर समांतर जोडणीमध्ये V विद्युत दाबाच्या स्त्रोतास जोडले असल्यास. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
(ASO Pre. 2015)

24 / 241

Category: भौतिकशास्र

24. पातळपडद्या द्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला - - - - - - - -  म्हणतात. 
    (Combined B Pre. 2022)

25 / 241

Category: भौतिकशास्र

25. रेडिओलहरींचा वापर खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात केला जातो ? 
      (MES Ele & Mech. 2014) 

26 / 241

Category: भौतिकशास्र

26. उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम (उद्वाहक + प्रवासी) आहे. हे उद्वाहक ऊर्ध्व दिशेने 2 ms-1 या एकसमान चालीने गतिमान आहे. गतिला विरोध करणारे घर्षण बल 4000 N आहे. तर मोटर यंत्राकडून उद्वाहकाला किमान किती ताकद पुरवली गेली ते निश्चित करा. (g = 10 m/s2)
(Rajyaseva Pre. 2017)

27 / 241

Category: भौतिकशास्र

27. खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे?
(Rajyaseva Pre., 2022)

28 / 241

Category: भौतिकशास्र

28. 10 ओहमचा रोध 12 V च्या विद्युतघटास जोडल्यास रोधातून 1.1 A विद्युतधारा वाहते. विद्युतघटाचा अंतर्गत रोध काढा.
(Rajyaseva Pre. 2018)

29 / 241

Category: भौतिकशास्र

29. 1 A विद्युत प्रवाह प्रत्येकी 1M NaCI, 1M KCI आणि1 M RbCl च्या द्रावणांतून स्वतंत्रपणे एका सेकंदासाठी पाठविला. निक्षेपण होणाऱ्या धातूंच्या ग्रॅम रेणुंतले (nm) अचूक संबंध असे आहेत.
(Combined 'B' Pre. 2017)

30 / 241

Category: भौतिकशास्र

30. खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात ?
(Rajyaseva Pre., 2022)

31 / 241

Category: भौतिकशास्र

31. कॉपरच्या जर्मन सिल्व्हर धातुमिश्रणात - - - - - - - - . असते.
(Combined 'B' 2020)

32 / 241

Category: भौतिकशास्र

32. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केन्द्रस्थानी आहे ?
(Rajyaseva Pre. 2012)

33 / 241

Category: भौतिकशास्र

33. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ) दूरदृष्टीदोष हा बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. 
ब) लघुदृष्टीदोष हा बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. 
क) दूरदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो. 
ड) लघुदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो. 
     (Excise Pre. 2017)

34 / 241

Category: भौतिकशास्र

34. विजोड गोष्ट ओळखा :
(Tax. Asst. 2016)

35 / 241

Category: भौतिकशास्र

35. योग्य जोड्या जुळवा.
a) गुरुत्वाकर्षण i)कुलंब/सेकंद
b) विद्युतधारा ii)ओहम्स्
c) वेग iii)मी. /से.2
d) विद्युतरोध iv)मी. /सेकंद
(Combined 'C' Pre. 2019)

36 / 241

Category: भौतिकशास्र

36. + 4 m आणि - 2 m नाभीय अंतरे असलेले दोन पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली, तर त्यांच्या संयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती ? 
      (Asst. Pre. 2011) 

37 / 241

Category: भौतिकशास्र

37. α - कण ह्यांनी शोधुन काढले : 
      (Rajyaseva Pre. 2015)

38 / 241

Category: भौतिकशास्र

38. जर 0.2 A इतकी विद्युतधारा 100 Ω रोध असलेल्या तारेच्या विद्युतइस्त्री मधून एका मिनीटासाठी प्रवाहित केली, तर किती ज्यूल उष्मा निर्माण होईल ?
(Combined 'C' Pre. 2018)

39 / 241

Category: भौतिकशास्र

39. 25 वॅटचा विद्युत दिवा दररोज 10 तास चालतो. तर विद्युत दिवा एका दिवसात किती युनिट उर्जा वापरतो ?
(PSI Mains 2011)

40 / 241

Category: भौतिकशास्र

40. विद्युतक्षेत्रामध्ये अनंत अंतरावरून हव्या असलेल्या बिन्दूपर्यंत एक एकक धन विद्युतभार आणण्यासाठी क्षेत्राच्या विरूद्ध दिशेने करावे लागणारे कार्य म्हणजे त्या बिंदूचा - - - - - - - - म्हटले जाते.
अ) विद्युत विभव
ब) विद्युत प्रवाह
क) विद्युत विरोध
ड) विद्युत कार्य
(AMVI Pre.2020)

41 / 241

Category: भौतिकशास्र

41. मृगजळ पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसते ?
      (PSI Pre. 2013)

42 / 241

Category: भौतिकशास्र

42. जलविद्युत केन्द्रामध्ये ऊर्जाचे रूपान्तर होते.
(Excise Pre. 2017)

43 / 241

Category: भौतिकशास्र

43. एकाच धातूपासून बनवलेल्या दोन तारा A आणि B यांची लांबी 6 : 1 या प्रमाणात आहे. दोन्ही तारा एकसर पद्धतीने जोडलेली आहेत. दोन तारांमधील विभवांतर अनुक्रमे 3 V व 2 V आहे. जर RA आणि RB अनुक्रमे A व B तारांच्या त्रिज्या असतील तर RA / RB = - - - - - - - - .
(MTS Pre. 2021)

44 / 241

Category: भौतिकशास्र

44. बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात ?
      (STI Pre. 2015)

45 / 241

Category: भौतिकशास्र

45. जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांच्या परिणामी रोध 45 2 होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांच्या परिणामी रोध 10 2 होतो, तर त्या रोधाच्या किंमती किती ?
(Combined 'C' Pre. 2018)

46 / 241

Category: भौतिकशास्र

46. हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, त्याला - - - - - - - - म्हणतात.
(ASO Pre. 2014)

47 / 241

Category: भौतिकशास्र

47. पृथ्वीच्या वातावरणाच्या - - - - - - - - भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो.
(Rajyaseva Pre., 2022)

48 / 241

Category: भौतिकशास्र

48. पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोन 60° आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल?
(Rajyaseva Pre. 2017)

49 / 241

Category: भौतिकशास्र

49. जेव्हा-जेव्हा ध्वनीचा स्त्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणारा ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. याला - - - - - - - -  म्हणतात.
    (Combined Group C Pre. 2022)

50 / 241

Category: भौतिकशास्र

50. ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 cm आहे, अशा व्यक्तीच्या चष्माच्या भिंगांचे नाभीय अंतर किती असेल?
      (Rajyaseva Pre. 2018)

51 / 241

Category: भौतिकशास्र

51. लेसर किरण पृथ्वीवर चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्रच्या पृष्ठभागापासुन परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती ? 
      (Rajyaseva Pre. 2021) 

52 / 241

Category: भौतिकशास्र

52. एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा :
2a, 36, 4c
(Combined 'B' Pre. 2019)

53 / 241

Category: भौतिकशास्र

53. खालीलपैकी कोणत्या दिव्याची कार्यक्षमता जास्त आहे?
(Rajyaseva Pre. 2011)

54 / 241

Category: भौतिकशास्र

54. योग्य जोड्या लावा.
(I) किरणोत्सारी समस्थानिके
अ) युरेनियम
ब) कोबाल्ट
क) आयोडिन
ड) कार्बन
(II) उपयोग
1) कर्करोगावरील उपचार
2) गॉयटर वरील उपचार
3) अष्मांचे वय
4) अणुभट्टी
(PSI Pre. 2013)

55 / 241

Category: भौतिकशास्र

55. ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेमी आहे, अशा डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर किती असेल, जर काचेचा वक्रीभवन दर्शक 1.50 असेल? 
       (Rajyaseva Pre. 2017) 

56 / 241

Category: भौतिकशास्र

56. 60W शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल ?
(Asst. Pre. 2011)

57 / 241

Category: भौतिकशास्र

57. एखादी व्यक्ती 2.0 मी. पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता  भिंगाची शक्ती (पावर) किती असावी? 
      (Combined 'B' Pre. 2017) 

58 / 241

Category: भौतिकशास्र

58. खालील विधानांचा विचार करा :
अ) मृत प्राणी अथवा वनस्पती यांचेमध्ये कार्बन-14 ते कार्बन - 12 यांचे गुणोत्तर बदलत असते.
ब) किरणोत्सारी कार्बन - 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात.
(Rajyaseva Pre. 2020)

59 / 241

Category: भौतिकशास्र

59. स्थिरांकाचे (a) चे एकक - - - - - - - - व्हॅन डर वाल्स.
(Rajyaseva Pre. 2017)

60 / 241

Category: भौतिकशास्र

60. एकमेकांपासून 1 मिलिमीटर अंतरावर असलेली दोन समांतर रेखाच्छीद्र पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर 500 नॅनोमीटर तंरंगलांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतिकरण परिणामामुळे तयार झालेल्या पक्तींमधील अंतर किती ? 
       (Rajyaseva Pre. 2018) 

61 / 241

Category: भौतिकशास्र

61. मलगममध्ये नितांत आवश्यकता काय असते ?
(STI Pre, 2015)

62 / 241

Category: भौतिकशास्र

62. खालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत ? 
अ) ध्वनी तरंग हे अवतरंग असतात
ब) ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारिता 20 kHz आणि त्यापेक्षा अधिक असते.
क) ध्वनी तरंगांच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
ड) अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ (Noise) म्हटले जाते. पर्यायी उत्तरे :
     (Combined 'B' Pre. 2019)

63 / 241

Category: भौतिकशास्र

63. आधुनिक वैद्यकीय प्रतिमा तंत्रातील (Medical Imaging) सीटी स्कॅन (CT Scan) पद्धतीत खालीलपैकी कोणते विकिरण वापरले जाते ? 
      (Rajyaseva Pre. 2012) 

64 / 241

Category: भौतिकशास्र

64. दूरध्वनी कर्णश्रवणीचे कार्य विद्युत धारेचा - - - - - - - - परिणाम या तत्त्वावर चालते.
(PSI Mains. 2011)

65 / 241

Category: भौतिकशास्र

65. MKS पद्धतीत दाबाचे एकक - - - - - - असते.
    (STI Pre.2011) 

66 / 241

Category: भौतिकशास्र

66. 20 ग्रॅम बर्फास 1600 कॅलरी उष्णता दिल्यास त्याचे अंतिम तापमान किती होईल ?
(PSI Pre. 2012)

67 / 241

Category: भौतिकशास्र

67. उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल ?
(STI Pre. 2011)

68 / 241

Category: भौतिकशास्र

68. - - - - - - - - मिश्र धातुचे, उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस करतात.
(Combined 'B' 2021)

69 / 241

Category: भौतिकशास्र

69. जर प्रकाश पहिल्या माध्यमातुन 2 X 108 ms-1 वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग 1.25 X 108 ms-1 होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक काढा. 
    (Rajyaseva Pre. 2021)

70 / 241

Category: भौतिकशास्र

70. - - - - - - - - चे मापन करण्यासाठी 'गेगर मूलर काऊंटर' हे उपकरण वापरले जाते.
(MES Ele & Mech. 2014)

71 / 241

Category: भौतिकशास्र

71. ध्वनीलहरींच्या प्रसारणासाठी : 
      (PSI Pre. 2013) 

72 / 241

Category: भौतिकशास्र

72. चंद्रशेखर मर्यादा - - - - - - - - आहे.
(ASO Pre. 2014)

73 / 241

Category: भौतिकशास्र

73. एका सुक्ष्मतरंगीय भट्टीमध्ये 0.15 kW.hr उर्जा 20 मिनिटे वापरण्यात आली तर त्या भट्टीची शक्ती - - - - - - - - आहे.
(STI Mains 2011)

74 / 241

Category: भौतिकशास्र

74. अति लघु रेडीओतरंग भट्टीचे (2.45 GHz फ्रिक्वेन्सी) फायदे काय आहेत ? 
अ) त्याचेमध्ये ज्वाला नाहीत 
ब) पदार्थातील पौष्टिकता कमी प्रमाणात नष्ट होते. 
क) अन्नपदार्थामध्ये भौतिक बदल घडतो 
ड) निर्जंतूकरण होते  
     (Rajyaseva Pre. 2014)

75 / 241

Category: भौतिकशास्र

75. पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे भारतातील कुठल्या प्राचीन उद्योगाचे ग्रेट ब्रिटनकडे स्थलांतर ?
(Rajyaseva Pre. 2011)

76 / 241

Category: भौतिकशास्र

76. पुढील विधानांचा विचार करा :
अ) ऋण भारित बीटा कण हे धन भारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात.
ब) उदासीन (धन अथवा ऋण नसलेले) गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात.
क) सर्वसाधारणपणे उदासीन कणांची (धन अथवा ऋण भारित नसलेले) अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते.
      (Rajyaseva Pre. 2019)

77 / 241

Category: भौतिकशास्र

77. प्रकाश जेव्हा एक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो, तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही ? 
   (Clerk Mains 2021) 

78 / 241

Category: भौतिकशास्र

78. खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत ?
अ) दगड गोटे व बालू
ब) बारीक माती व कुजलेले पदार्थ
क) रासायनिक पदार्थ
ड) रंगद्रव्ये
(Rajyaseva Pre., 2022)

79 / 241

Category: भौतिकशास्र

79. इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयझक गतीविषयक तीन नियम मांडलेत ?
(Rajyaseva Pre. 2012)

80 / 241

Category: भौतिकशास्र

80. खालीलपैकी - - - - - - - - या शास्त्रज्ञाने शनीपलीकडील प्रजापती किंवा युरेनस या ग्रहाचा शोध लावला.
(MES Ele & Mech. 2014)

81 / 241

Category: भौतिकशास्र

81. एका माध्यमात प्रकाशाचा वेग 1.5 x 108 मी./सेकंद आहे. जर हवेतील वेग 3 x 108 मी. /सेकंद असल्यास, तर त्या माध्यमाचा हवेच्या संदर्भात अपवर्तनांक - - - - - - - -  असेल.
     (Clerk Mains 2017)

82 / 241

Category: भौतिकशास्र

82. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?
(STI Pre. 2013)

83 / 241

Category: भौतिकशास्र

83. एखादा पदार्थ उर्ध्व दिशेने फेकला असतांना त्याची :
(Asst. Pre. 2012)

84 / 241

Category: भौतिकशास्र

84. दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बांबीचे संवर्धन होईल ?
(Rajyaseva Pre. 2019)

85 / 241

Category: भौतिकशास्र

85. पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहा Ek इतकी गतिज ऊर्जा आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर
निसरण्यासाठी किमान केवढी उर्जा दिली पाहिजे ?
(Rajyaseva Pre. 2015)

86 / 241

Category: भौतिकशास्र

86. खालीलपैकी कोणत्या तरंगांचे (waves) ध्रुवीकरण (polarization) होत नाही ? 
      (Forest Pre. 2013)

87 / 241

Category: भौतिकशास्र

87. पुढील विधानांचा विचार करा :
अ) दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते.
ब) म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते.
(Rajyaseva Pre. 2020)

88 / 241

Category: भौतिकशास्र

88. कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी - - - - - - - - वापरली जातात.
(Combined Group C Pre. 2022)

89 / 241

Category: भौतिकशास्र

89. 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते. जर एका युनिटचा दर रू. 3.00 असेल, तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती ?
(Rajyaseva Pre. 2020)

90 / 241

Category: भौतिकशास्र

90. ब्रास हा मिश्रधातु खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?
(PSI Pre. 2014)

91 / 241

Category: भौतिकशास्र

91. सुर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणानी होते ?
(PSI Pre. 2013)

92 / 241

Category: भौतिकशास्र

92. एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला - - - - - - - -  म्हणून ओळखले जाते. 
      (STI Pre. 2013)

93 / 241

Category: भौतिकशास्र

93. दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते? 
      (Rajyaseva Pre. 2015)

94 / 241

Category: भौतिकशास्र

94. अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 
अ) जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात.
ब) जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात.
     योग्य पर्याय निवडा :
     (Combined 'B' Pre. 2018)

95 / 241

Category: भौतिकशास्र

95. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते ?
(Asst. Pre. 2011)

96 / 241

Category: भौतिकशास्र

96. जलविद्युत प्रकल्पामध्ये - - - - - - - -
(PSI Pre. 2013)

97 / 241

Category: भौतिकशास्र

97. - - - - - - - - या पदार्थाच्या बाबतीत विद्युत धारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळरेषीय येत नाही व रोधाचे मूल्य स्थिर राहत नाही.
(PSI Pre. 2012)

98 / 241

Category: भौतिकशास्र

98. 1999 साली अमेरिकेच्या नासा या संस्थेने ‘क्ष' -किरण दुर्बीन अवकाशात सोडली. त्यास खालीलपैकी कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचे नाव देण्यात आले ?
    (Clerk Mains 2021)

99 / 241

Category: भौतिकशास्र

99. उपसर्ग गुणांक 1018 चा किती?
(Rajyaseva Pre. 2017)

100 / 241

Category: भौतिकशास्र

100. - - - - - - - - याने उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती असल्याचे दाखवून दिले.
(PSI Mains 2011)

101 / 241

Category: भौतिकशास्र

101. पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण 'प्रिझम' मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ठ असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (separated) होतात. या दृक चमत्काराला - - - - - - - -  म्हणतात. 
       (Combined 'C' Pre. 2018)

102 / 241

Category: भौतिकशास्र

102. सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो, कारण काळ्या रंगाचे आवरण- - - - - - - -
(PSI Pre. 2012)

103 / 241

Category: भौतिकशास्र

103. खालील विधाने विचारात घ्या.
अ) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो.
ब) वेगवेगळ्या माध्यमामधे प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. 
     खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :
     (Combined 'B' Pre. 2019)

104 / 241

Category: भौतिकशास्र

104. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार - - - - - - - - . हा आहे.
(Rajyaseva Pre. 2012)

105 / 241

Category: भौतिकशास्र

105. अबिदुकता' हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाने नाहीसा करता येतो? 
      (Rajyaseva Pre. 2011)

106 / 241

Category: भौतिकशास्र

106. गतिमान वस्तूची गती अर्धी (1/2) केली तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती होईल ?
(Forest Pre. 2012)

107 / 241

Category: भौतिकशास्र

107. पुढील कोणते विधान योग्य आहे ?
अ) अल्युमिनियम चा धातूपाषाण AL2O3 2SiO2 2H2O आहे.
ब) सायडेराईट हा अल्युमिनियमचा खनिज क्षार आहे.
(STI Pre. 2014)

108 / 241

Category: भौतिकशास्र

108. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले नाही ?
(Rajyaseva Pre. 2013)

109 / 241

Category: भौतिकशास्र

109. खालील वाक्ये लक्षात घ्या.
अ) कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते.
ब) अल्फा कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही बीटा कणाच्या वेधन शक्ती (सामर्थ्य) पेक्षा कमी आहे. 
     खालीलपैकी कोणते विधान वरील वाक्यांची परिस्थिती योग्य रीत्या दाखवते ?
     (Rajyaseva Pre. 2013)

110 / 241

Category: भौतिकशास्र

110. α, β, γ या किरणांच्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा. 
      (Asst. Pre. 2011)

111 / 241

Category: भौतिकशास्र

111. योग्य जोड्या लावा.
अ) थॅलियम - 201
ब) आर्सेनिक - 74
क) कोबाल्ट - 60
ड) होल्मियम - 166
1) संधिवात उपचार
2) शरीरातील गाठींचा शोध
3) हृदयातील रक्तप्रवाहाचा मार्ग
4) कॅन्सर उपचार
(MES Ele & Mech. 2014)

112 / 241

Category: भौतिकशास्र

112. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात ? 
      (Combined 'B' 2020)

113 / 241

Category: भौतिकशास्र

113. - - - - - - - -  हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात.
    (Clerk Mains 2021)

114 / 241

Category: भौतिकशास्र

114. एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ असून तरंगलांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल, तर कापलेले अंतर काढा. 
    (Rajyaseva Pre., 2022)

115 / 241

Category: भौतिकशास्र

115. 10kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 m/s2. असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितीज ऊर्जा किती ?
(STI Pre. 2012)

116 / 241

Category: भौतिकशास्र

116. रमन परिणाम' कशास म्हणतात? 
      (Rajyaseva Pre. 2014) 

117 / 241

Category: भौतिकशास्र

117. डोळ्याची व कॅमेऱ्याची रचना यात साम्य असते. या संदर्भात पुढील दोन विधाने पहा.
अ) बुबुळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते. 
ब) भिंगाचे स्नायू (सिलीअरी स्नायू) अंतर बदलण्याची व्यवस्था पहाते.
     (STI Pre. 2014) 

118 / 241

Category: भौतिकशास्र

118. आपल्या पृथ्वीच्या सभोवती असलेल्या ओझोन (ozone) आवरणाचा अवक्षय (depletion) झाल्याने, खालीलपैकी कोणत्या विकिरणाची प्रकाशन वृद्धि (exposure) वाढते ? 
      (Rajyaseva Pre. 2012)

119 / 241

Category: भौतिकशास्र

119. खालील धातू विचारात घ्या.
अ) प्लॅटिनम
ब) सोने
क) तांबे
ड) शिसे
चढत्या घनतेनुसार त्याची क्रमवारी लिहा :
(Rajyaseva Pre. 2013)

120 / 241

Category: भौतिकशास्र

120. - - - - - - - - हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.
(STI Pre. 2011)

121 / 241

Category: भौतिकशास्र

121. लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात ? 
      (Rajyaseva Pre. 2015)

122 / 241

Category: भौतिकशास्र

122. जर पाण्याची घनता 1000 kgm-3 आणि तांब्याची घनता 8.9 X 103 kgm-3 असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती?
(Rajyaseva Pre. 2021)

123 / 241

Category: भौतिकशास्र

123. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 
अ) लाल रंगाचा विचलन कोन सर्वाधिक असतो. 
ब) जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते. 
     (STI Pre. 2014)

124 / 241

Category: भौतिकशास्र

124. औद्योगिक उत्पादनांची शुद्धता तपासण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करणे इष्ट ठरेल ? 
      (MES Ele & Mech. 2014) 

125 / 241

Category: भौतिकशास्र

125. दोन भिंगाचे नाभीय अंतर हे 2 मीटर व 1 मीटर आहे, तर त्या भिंगाची परिणामी शक्ती किती असेल ?
    (MTS Pre. 2021)

126 / 241

Category: भौतिकशास्र

126. खालीलपैकी योग्य वाक्यांची निवड करा.
अ) ध्वनिलहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. 
ब) ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात.
क) ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत. 
ड) ध्वनिलहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. पर्यायी उत्तरे :
(Rajyaseva Pre. 2014)

127 / 241

Category: भौतिकशास्र

127. चष्म्यांचे भिंग - - - - - - - -  यापासून बनवतात.
      (STI Pre. 2015)

128 / 241

Category: भौतिकशास्र

128. लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते. जर सुर्यप्रकाश, सुर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनीट व 20 सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सुर्य व पृथ्वीमधील अंतर किती ? 
      (Rajyaseva Pre. 2017)

129 / 241

Category: भौतिकशास्र

129. - - - - - - - - वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
(STI Pre. 2013)

130 / 241

Category: भौतिकशास्र

130. कोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो ?
      (PSI Pre. 2011)

131 / 241

Category: भौतिकशास्र

131. रासायनिक घटाचे विद्युतगामक बल धन असते, जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा - - - - - - - - असतो.
(Rajyaseva Pre. 2020)

132 / 241

Category: भौतिकशास्र

132. खालीलपैकी कशास नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून ओळखता येणार नाही ?
(MES Ele & Mech. 2014)

133 / 241

Category: भौतिकशास्र

133. खालील निर्देशित ऐकण्याच्या प्रमाणानुसार नागरीकांची ऐकण्याची क्षमता, ऐकण्यात बिघाड न होता किती आहे? 
     (Rajyaseva Pre. 2011)

134 / 241

Category: भौतिकशास्र

134. अ) अतीनील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाच्या 'तरंग लांबी' पेक्षा लहान 'तरंग लांबी' चा वर्णपट भाग आहे.
ब) 'इन्फ्रारेड' भाग हा लाल रंगापेक्षा कमी 'तरंग लांबी' वर्णपटाचा भाग आहे.
क) एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी, वक्रीभवन- निर्देशांक, वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळा असतो.
     वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
     (PSI Pre. 2014)

135 / 241

Category: भौतिकशास्र

135. दूरध्वनी कर्ण श्रवणीचे कार्य विद्युत धारेचा - - - - - - - - परिणाम या तत्वानुसार चालते.
(Forest Pre. 2012)

136 / 241

Category: भौतिकशास्र

136. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात ?
      (Rajyaseva Pre. 2012)

137 / 241

Category: भौतिकशास्र

137. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 
अ) अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात. 
ब) अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.
     (Rajyaseva Pre. 2016)

138 / 241

Category: भौतिकशास्र

138. सोलार सेलचे (सौर घट) कार्य - - - - - - - -  वर आधारित आहे. 
      (Combined 'B' 2020) 

139 / 241

Category: भौतिकशास्र

139. एका वाफेच्या इंजिनला 3.6 x 109 J/min दराने उष्णता पुरवली जाते. त्यापासून इंजिन 5.4 x 108 J/min
दराने कार्य करते. अशा इंजिनची कार्यक्षमता किती टक्के असेल ?
(Rajyaseva Pre. 2018)

140 / 241

Category: भौतिकशास्र

140. विद्युत दिव्यामध्ये रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :
अ) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.
ब) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.
क) निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात.
ड) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात. :
(ASO Pre. 2016)

141 / 241

Category: भौतिकशास्र

141. कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात ? 
      (Asst. Pre. 2012) 

142 / 241

Category: भौतिकशास्र

142. रेडिओ तरंगाचा वेग - - - - - - - -  असतो. 
      (ASO Pre. 2016)

143 / 241

Category: भौतिकशास्र

143. 0.5 Kg वस्तुमानाची एक वस्तू वर फेकली असता ती जास्तीत जास्त 5 मीटर वर जात असेल तर गुरूत्वबलाने
केलेले कार्य - - - - - - - - असेल.
(AMVI Pre.2020)

144 / 241

Category: भौतिकशास्र

144. अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारे प्रारण उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याच्या गुणधर्मास - - - - - - - - म्हणतात.
(PSI main. 2011)

145 / 241

Category: भौतिकशास्र

145. खालीलपैकी - - - - - - - - या धातूचा विद्युतरोध सर्वाधिक असतो.
(MES Ele & Mech. 2014)

146 / 241

Category: भौतिकशास्र

146. एका पाण्याने भरलेल्या रबरी चेडूंच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलन काल
      (Asst. Pre. 2011)

147 / 241

Category: भौतिकशास्र

147. जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमानात काय होते ?
(Rajyaseva Pre. 2012)

148 / 241

Category: भौतिकशास्र

148. - - - - - - - -  किरणांना वस्तुमान नसते.
      (STI Pre. 2011)

149 / 241

Category: भौतिकशास्र

149. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?
(Asst. Pre. 2012)

150 / 241

Category: भौतिकशास्र

150. शल्यविशारद गुंतागुतीच्या शस्त्र क्रिया हाताने न करता संगणकाच्या साह्याने शस्त्र क्रियेचे आयुधे नियंत्रित करतात त्यास - - - - - असे म्हणतात.
(Rajyaseva Pre. 2011)

151 / 241

Category: भौतिकशास्र

151. भारतात जन्मलेल्या कोणत्या भौतिक शाखज़ाना त्याच्या "साऱ्यांची रचना आणि विकास क्रम"' या विषयावरील संशोधनाकरता नोबेल पारितोषिक देण्यात आले ?
(Rajyaseva Pre. 2012)

152 / 241

Category: भौतिकशास्र

152. उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो, कारण 
      (ASO Pre. 2015) 

153 / 241

Category: भौतिकशास्र

153. कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत, उष्णता स्थानांतरण - - - - - - - -
(Combined 'B' 2021)

154 / 241

Category: भौतिकशास्र

154. समुद्राची खोली मोजण्यासाठी - - - - - - - -  वापरतात.
      (STI Pre. 2013)

155 / 241

Category: भौतिकशास्र

155. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे : 
    (Combined 'B' 2021)

156 / 241

Category: भौतिकशास्र

156. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण - - - - - - - -  असते. 
      (STI Pre. 2013)

157 / 241

Category: भौतिकशास्र

157. लेसर (LASER) या शब्दाची संक्षिप्त सज्ञा सांगा ?
      (Rajyaseva Pre. 2011)

158 / 241

Category: भौतिकशास्र

158. एका परिपथातून 600 कूलॉम इतका विद्युत प्रभार सलग 10 मिनिटे वाहत असेल, तर ह्या परिपथातून जाणार विद्युत धारा आहे.
(Clerk Mains 2017)

159 / 241

Category: भौतिकशास्र

159. जेव्हा 100° C तापमान असलेले 10gm पाणी हातावर पसरले असता किती ऊर्जा तयार होते, ते काढा. पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता = 4200 J kg-1 K-1 व हाताच्या कातडीचे तापमान = 30°C.
(Excise Pre. 2017)

160 / 241

Category: भौतिकशास्र

160. कोळश्याचे त्याच्या - - - - - - - - अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो.
(Rajyaseva Pre. 2013)

161 / 241

Category: भौतिकशास्र

161. 'm' वस्तुमान असलेली वस्तू v या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा - - - - - - - -
(PSI Pre. 2011)

162 / 241

Category: भौतिकशास्र

162. जर एखादी जड वस्तु क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली, तर त्या वस्तुवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल.
अ) क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल
ब) लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरूत्वीय बल
क) स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल
ड) उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल
वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत?
(Rajyaseva Pre. 2014)

163 / 241

Category: भौतिकशास्र

163. फळे व फुलांवर - - - - - - - -   किरणांचा सौम्य मारा करून फळांची उत्पादकता वाढविता येते.
      (MES Ele & Mech. 2014)

164 / 241

Category: भौतिकशास्र

164. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? 
      (Rajyaseva Pre. 2013)

165 / 241

Category: भौतिकशास्र

165. विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवितात ते बेकालाईट पॉलीमर कशापासून तयार करतात ?
(Asst. Pre. 2013)

166 / 241

Category: भौतिकशास्र

166. मृगजळ - - - - - - - -  मुळे तयार होते. 
      (Rajyaseva Pre. 2011) 

167 / 241

Category: भौतिकशास्र

167. व्यवसायिक शीत गृहात, लोणी किती तापमानावर ठेवले जाते ?
(Rajyaseva Pre. 2015)

168 / 241

Category: भौतिकशास्र

168. ध्वनीतरंग ही यांत्रिकी अनुतरंग असून खालीलपैकी कोणत्या माध्यमातून त्या प्रवास करतात? 
    (MTS Pre. 2021) 

169 / 241

Category: भौतिकशास्र

169. परफॉर्म, अचिव्ह आणि ट्रेड (PAT) योजना ही कशाशी संबंधित आहे ?
(MES Ele & Mech. 2014)

170 / 241

Category: भौतिकशास्र

170. एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती ?
(Rajyaseva Pre. 2021)

171 / 241

Category: भौतिकशास्र

171. क्ष-किरण किंवा किरणोत्सर्जी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला - - - - - - - -  म्हणतात.
(STI Pre. 2012)

172 / 241

Category: भौतिकशास्र

172. ट्रटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्षे असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतोय. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील ?
(Rajyaseva Pre. 2020)

173 / 241

Category: भौतिकशास्र

173. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
अ) चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात.
ब) चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर धुव्राजवळ संपतात.
(PSI Pre. 2013)

174 / 241

Category: भौतिकशास्र

174. खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत?
अ) श्रवणक्षमता आंशिक कमी होते (बहिरेपणा येतो) 
ब) पुनःरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो. 
क) गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.
ड) मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो.
इ) उच्च रक्तदाब (B.P.) निर्माण होतो.
     (Rajyaseva Pre. 2016)

175 / 241

Category: भौतिकशास्र

175. 750 वॅट शक्तीची विद्युत् इस्त्री दररोज 2 तास वापरली जाते. जर एक किलोवॅट तासाचा (Unit) दर ₹ 3.00 असेल, तर इस्त्रीसाठी 30 दिवसात वापरलेल्या विद्युत-ऊर्जेची किंमत किती ?
(Clerk Mains 2017)

176 / 241

Category: भौतिकशास्र

176. विद्युत परिपथातील वितळतार :
अ) उपकरणाशी एकसर जोडणीत जोडतात.
ब) उपकरणाशी समांतर जोडणीत जोडतात.
क) मिश्रधातू पासून बनवलेली असते.
ड) शुद्ध धातूपासून बनवलेली असते.
(STI Pre. 2014)

177 / 241

Category: भौतिकशास्र

177. खालीलपैकी खगोलशाखीय वस्तुंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढ़ता क्रम कोणता ?
(STI Pre. 2013)

178 / 241

Category: भौतिकशास्र

178. खालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो ?
      (STI Pre. 2016)

179 / 241

Category: भौतिकशास्र

179. खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरित्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये आढळतात ?
(Rajyaseva Pre. 2012)

180 / 241

Category: भौतिकशास्र

180. जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79% नायट्रोजन आणि 21% ऑक्सीजन पैकी कोणत्या घटकांची 25° सेल्सीअसला सर्व प्रथम बाहेर गळती होईल ?
अ) ऑक्सीजन, कारण त्याचे वस्तुमान नायट्रोजन पेक्षा जास्त आहे.
ब) नायट्रोजन, कारण त्याचे वस्तुमान ऑक्सीजन पेक्षा कमी आहे.
क) ऑक्सीजन आणि नायट्रोजन दोघांची एकाच वेळेला गळती होईल.
ड) सर्व भरलेली हवा गळती होऊन फुगा मूळ स्वरूप प्राप्त करेल.
(Rajyaseva Pre. 2013)

181 / 241

Category: भौतिकशास्र

181. खालीलपैकी कशाचा उपयोग शस्त्रक्रियागृहात हवा निर्जंतु करण्यासाठी केला जातो ?
(MES Ele & Mech. 2014)

182 / 241

Category: भौतिकशास्र

182. - - - - - - - - हे किरणोत्साराचे एस.आय. पद्धतीतील एकक आहे.
(PSI Pre. 2016)

183 / 241

Category: भौतिकशास्र

183. फ्रेसनल्स बायाप्रिझम मध्ये (λ) तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते ? 
      (Rajyaseva Pre. 2018)

184 / 241

Category: भौतिकशास्र

184. आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ?
      (ASO Pre. 2016)

185 / 241

Category: भौतिकशास्र

185. कोणत्या शास्त्रज्ञाच्या सिद्धांताने रूढ (classical) भौतिकीतून आधुनिक भौतिकीत संक्रमण (transition) झाले ?
(Rajyaseva Pre. 2012)

186 / 241

Category: भौतिकशास्र

186. खालील विधानांचा विचार करा : 
अ) दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते.
ब) ध्वनिचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो.
     वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेत ?
     (Rajyaseva Pre. 2016)

187 / 241

Category: भौतिकशास्र

187. जर 0.3A इतकी विद्युतधारा 418Ω रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल ?
(Combined 'B' Pre. 2018)

188 / 241

Category: भौतिकशास्र

188. खालील योग्य जोड्या लावा.
गट अ गट ब
अ) विभवांतर 1) अॅम्पीअर
ब) विद्युतप्रवाह 2) व्होल्ट
क) प्रभार 3) म्हो (mho)
ड) कंडक्टन्स 4) कूलंब
(PSI Pre. 2016)

189 / 241

Category: भौतिकशास्र

189. क्ष-किरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालींमध्ये कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात ? 
      (Clerk Mains 2019)

190 / 241

Category: भौतिकशास्र

190. SI एककात घनफळ हे - - - - - - -  असे दर्शविले जाते.
     (Clerk Mains 2021)

191 / 241

Category: भौतिकशास्र

191. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो. तर त्याची सरासरी चाल - - - - - - - - आहे.
(STI Pre. 2012)

192 / 241

Category: भौतिकशास्र

192. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते?
      (PSI Pre. 2013)

193 / 241

Category: भौतिकशास्र

193. जर 60 वॉटचा विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्रोतास जोडला तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती?
(STI Pre. 2012)

194 / 241

Category: भौतिकशास्र

194. विशिष्ठ वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मी./ से. असून तरंग लांबी 3 सेमी आहे. तर वारंवारता काढा. ती श्रवणीय असेल का ? 
      (Rajyaseva Pre. 2017)

195 / 241

Category: भौतिकशास्र

195. 2kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 30°C पासून 100°C पर्यंत वाढविण्यासाठी - - - - - - - - उष्णता लागेल.
(PSI Mains 2011)

196 / 241

Category: भौतिकशास्र

196. खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) हिरा विद्युत दुर्वाहक आहे.
ब) ग्रॅफाइट मध्ये व्दिमितीय पत्रकासारखी संरचना असते. 
क) ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे. 
ड) खडकाला भोक पाडायला हिरा वापरतात.
     (Rajyaseva Pre. 2021)

197 / 241

Category: भौतिकशास्र

197. वारंवारतेचे S.I. एकक काय आहे ? 
      (STI Pre. 2012)

198 / 241

Category: भौतिकशास्र

198. जर 10 से.मी. नाभीय अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांपासून 10 से.मी. अंतरावर ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचा भिंगांक किती असेल ?
      (PSI Pre. 2011)

199 / 241

Category: भौतिकशास्र

199. प्रतिध्वनी तरच ऐकू येतो, जर ध्वनीचा स्त्रोत आणि अडथळा यांतील अंतर - - - - - - - -  असेल. 
    (Combined B Pre. 2022)

200 / 241

Category: भौतिकशास्र

200. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय ?
(Asst. Pre. 2012)

201 / 241

Category: भौतिकशास्र

201. प्रत्येकी 16 22 रोध असणारे चार रोधित्रांची समांतर जोडणी केली. अशा प्रकारच्या चार रोधिकांची एकसरी संयोगी जोडणी केल्यास एकूण परिणामी रोध किती?
(PSI Pre. 2012)

202 / 241

Category: भौतिकशास्र

202. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?
      (Asst. Pre. 2013)

203 / 241

Category: भौतिकशास्र

203. भारतीय लष्कराच्या मूलभूत रणांगण संरचने (Basic Field Formation) बाबत जोड्या लावा :
संघटन
अ) बटालियन
ब) डिव्हिजन
क) प्लेटून
ड) कंपनी
प्रमुखपदी
1) मेजर जनरल
2) मेजर अथवा कैप्टन
3) कर्नल
4) कैप्टन किंवा लेफ्टनंट
(Rajyaseva Pre. 2016)

204 / 241

Category: भौतिकशास्र

204. धातुंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार - - - - - - - - असते.
(Combined 'B' Pre. 2017)

205 / 241

Category: भौतिकशास्र

205. वीज चमकल्याच्या 5 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला. जर ध्वनीचा हवेतील वेग 340 मी./से. आहे, तर 
      विजेचा स्थान - - - - - - - - अंतरावर असेल. 
      (Clerk Mains 2017)

206 / 241

Category: भौतिकशास्र

206. कोणत्या घटनेद्वारे प्रकाशाच्या अवतरंग स्वरूपाची पुष्टी केली जाते ?
      (Clerk Mains 2019)

207 / 241

Category: भौतिकशास्र

207. कोणाची आयनन ऊर्जा (IE) सर्वात जास्त आहे ?
(Rajyaseva Pre. 2021)

208 / 241

Category: भौतिकशास्र

208. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
अ) कमी विद्युतरोधासाठी कमी लांबीची, जाड तार वापरतात.
ब) जास्त विद्युतरोधासाठी कमी लांबीची, बारीक (thin) तार वापरतात.
(PSI Pre. 2013)

209 / 241

Category: भौतिकशास्र

209. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो ? 
      (Rajyaseva Pre. 2012) 

210 / 241

Category: भौतिकशास्र

210. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची/चा - - - - - - - -  वाढवितो.
      (STI Pre. 2016)

211 / 241

Category: भौतिकशास्र

211. एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्धआयुष्य काल 4 तास आहे. तर 3 अर्धआयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितव्या
हिस्स्याचा ऱ्हास होईल.
(Asst. Pre. 2011)

212 / 241

Category: भौतिकशास्र

212. वाहकातील दोन बिंदुमधील विद्युत विभवांतर (V) - - - - - - - - या द्वारे व्यक्त केला जातो.
(Asst. Pre. 2011)

213 / 241

Category: भौतिकशास्र

213. लिमोनाइट द्या लोखंडाच्या धातुकाचे रासायनिक रेणुसुत्र - - - - - - - - हे आहे.
(ASO Pre. 2016)

214 / 241

Category: भौतिकशास्र

214. योग्य जोड्या लावा.
'गट अ
अ) सी.व्ही. रमण
ब) जॉर्ज ओहम
क) हॅन्स ओरस्टेड
ड) मायकेल फॅरेडे
गट ब
1) विद्युतधारेद्वारे चुंबकत्व निर्मिती
2) विद्युत मोटर
3) प्रकाशाचे विकिरण
4) विद्युत परिपथातील रोध
5) विद्युत धारा
(Combined 'B' Pre. 2018)

215 / 241

Category: भौतिकशास्र

215. जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांचा परिणामी रोध 45 Ω होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले, तर त्यांचा परिणामी रोध 10 Ω होतो. तर त्या रोधांच्या किंमती काढा.
(Rajyaseva Pre. 2017)

216 / 241

Category: भौतिकशास्र

216. विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ) दूरदर्शन लहरी
ब) अतिनील किरणे
क) क्ष-किरणे
ड) सूर्यप्रकाश किरणे
(Rajyaseva Pre. 2016)

217 / 241

Category: भौतिकशास्र

217. अतिनील किरणे - - - - - - - - मधून आरपार जाऊ शकत नाहीत.
अ) कांच             ब) क्वार्टझ
क) फ्लूओराईट    ड) रॉक सॉल्ट (सैंधव) 
     (Rajyaseva Pre. 2015)

218 / 241

Category: भौतिकशास्र

218. चंद्र क्षितीजाजवळ असताना मोठा दिसतो. याचे कारण म्हणजे - 
      (Rajyaseva Pre. 2011)

219 / 241

Category: भौतिकशास्र

219. एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील?
(Rajyaseva Pre. 2016)

220 / 241

Category: भौतिकशास्र

220. धातूंच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर नाही ? 
      (Rajyaseva Pre. 2011)

221 / 241

Category: भौतिकशास्र

221. सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते ?
(Rajyaseva Pre. 2012)

222 / 241

Category: भौतिकशास्र

222. सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (डी. डी.व्ही.) किती असतो ? 
      (STI Pre. 2015) 

223 / 241

Category: भौतिकशास्र

223. योग्य जोड्या लावा.
यादी । (विद्युत उपकरण)
अ) रेडिओ संच ब) टी.व्ही. संच
क) फ्रिज ड) इलेक्ट्रिक प्रेस (इस्त्री)
यादी II (सामान्यतः पॉवर)
1)120 W 2) 750 W
3) 80 W 4) 150 W
(PSI Pre. 2013)

224 / 241

Category: भौतिकशास्र

224. खालील दोन विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) चुंबकीय अनुनाद प्रतिमा (MRI) शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते.
ब) सी.टी. स्कॅन क्ष-किरण व एम्.आर.आय. पेक्षा उच्च दर्जाची आहे.
(Rajyaseva Pre. 2016)

225 / 241

Category: भौतिकशास्र

225. - - - - - - - -  अंदाजे एक मिलीमीटरपेक्षा जास्त तरंगदैर्ध्य असलेल्या प्रारणांचा अभ्यास करतो.
    (Clerk Mains 2021)

226 / 241

Category: भौतिकशास्र

226. 20 ओह्म रोध असलेला विद्युत परिपथातून 0.5 अॅम्पियर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात - - - - - - विभवांतर असावे.
(PSI Pre. 2011)

227 / 241

Category: भौतिकशास्र

227. व्हर्नियर कॅलिपरच्या व्हर्नियर स्केल वर 25 खुणा असून मुख्य मापणपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मी.मी. आहे म्हणून व्हर्नियर कॅलिपरचे लघुत्तम माप किती मी.मी. येईल ?
    (PSI Pre. 2012)

228 / 241

Category: भौतिकशास्र

228. श्रव्यातीत ध्वनीलहरींच्या साहाय्याने बारकाईने केलेली तपासणी - - - - - - - -  साठी उपयोगी आहे.
अ) गर्भात असलेला दोष समजण्यासाठी 
ब) हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी 
     (STI Pre. 2016)

229 / 241

Category: भौतिकशास्र

229. खालीलपैकी कोणत्या धातुके मध्ये तांबे व लोखंड आहेत ?
(STI Pre. 2013)

230 / 241

Category: भौतिकशास्र

230. "वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते. " या सिद्धान्ताचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे
जाईल ?
(MES Ele & Mech. 2014)

231 / 241

Category: भौतिकशास्र

231. जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराइड मधून 100 A विद्युत प्रवाह 965 से. करिता प्रवाहित केला, तर
(Na=23, CI=35.5)
(Combined B Pre. 2019)

232 / 241

Category: भौतिकशास्र

232. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्मिक प्रवाहकता सर्वात जास्त असते ?
(Combined B Pre. 2022)

233 / 241

Category: भौतिकशास्र

233. 1 मिलीग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकेल ?
(PSI Pre. 2011)

234 / 241

Category: भौतिकशास्र

234. वीज बिलातील एका युनिटचे kWh ऊर्जा मूल्य किती?
(STI Pre. 2015)

235 / 241

Category: भौतिकशास्र

235. सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला/ सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते ?
(Rajyaseva Pre. 2015)

236 / 241

Category: भौतिकशास्र

236. 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये 33 V विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल ?
(Rajyaseva Pre., 2022)

237 / 241

Category: भौतिकशास्र

237. खालीलपैकी कोणते वाक्य/कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
अ) जास्त वास येणारे द्रव इथाईल मेरकाप्टन एल पी जी मध्ये मिसळण्यात येते.
ब) तो गॅस गळती शोधतो.
(PSI Pre. 2013)

238 / 241

Category: भौतिकशास्र

238. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याचा विद्युतरोध - - - - - - - - असेल.
(STI Pre. 2012)

239 / 241

Category: भौतिकशास्र

239. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते ?
      (Rajyaseva Pre. 2012)

240 / 241

Category: भौतिकशास्र

240. 1000 वॅट शक्तीची विद्युत इस्त्री दररोज 2 तास वापरली जाते. जर एक किलो वॅट तासाचा (Unit) दर रु. 3.00 असेल तर इस्त्रीसाठी मे महिन्यात वापरलेल्या विद्युत ऊर्जेची किंमत काढा.
(Clerk Mains 2019)

241 / 241

Category: भौतिकशास्र

241. “प्रत्येक क्रियेकरता तेवढीच व विरूद्ध प्रतिक्रिया असते". हा कोणता सिद्धान्त/नियम आहे.
(Asst. Pre. 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top