31

पंचायतराज

ग्रामपंचायत

1 / 67

Category: ग्रामपंचायत

1. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, - - - - - - पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील.
(संयुक्त गट 'क' पूर्व 2022)

2 / 67

Category: ग्रामपंचायत

2. ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधान निवडा.
अ) ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात.
ब) त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते.
क) ते ग्रामपंचायतीची महत्वाची कागदपत्र व हिशोब सांभाळतात.
ड) ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात.
(STI पूर्व 2013)

3 / 67

Category: ग्रामपंचायत

3. जोड्या लावा - (ग्रामसभेची गणपूर्ती) :
'अ' (राज्य/केंद्रशासित प्रदेश)
अ) बिहार
ब) चंदीगढ़
क) छत्तीसगढ़
ड) त्रिपुरा
'ब' (गणपूर्ती - एकूण मतदारसंख्येची टक्केवारी)
1) 10%
2) 5%
3) 12.5%
4) 20%
(ASO मुख्य 2018)

4 / 67

Category: ग्रामपंचायत

4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणा कडे आहेत ?
(STI पूर्व 2012)

5 / 67

Category: ग्रामपंचायत

5. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?
(ASO पूर्व 2011)

6 / 67

Category: ग्रामपंचायत

6. सरपंच निवडी संदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते ?
(ASO मुख्य 2019)

7 / 67

Category: ग्रामपंचायत

7. ग्रामसेवकाची निवड कोण करते ?
(ASO पूर्व 2011)

8 / 67

Category: ग्रामपंचायत

8. …- - - - - लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते.
(STI पूर्व 2012)

9 / 67

Category: ग्रामपंचायत

9. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या :
अ) सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी ग्रामंपंचायतीची विशेष सभा बोलवावी लागते.
ब) विशेष सभा बोलविण्याची मागणी किमान एक - तृतीयांश सदस्यांनी करणे आवश्यक असते.
क) विशेष सभेच्या मागणीची सूचना जिल्हाधिकाऱ्याला द्यावी लागते.
ड) ही सूचना दिल्यानंतर परत मागे घेता येते.
वरीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा मुख्य 2017)

10 / 67

Category: ग्रामपंचायत

10. ग्रामसभे संबंधीच्या खालील विधानांचा विचार करा:
अ) तो पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ठस्तर आहे.
ब) 73 व्या राज्यघटना दुरुस्तीने तीला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे.
क) ग्रामसभेत, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचा समावेश होतो.
ड) वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या चार बैठका घ्याव्या लागतात.
वरीलपैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?
(PSI पूर्व 2014)

11 / 67

Category: ग्रामपंचायत

11. ग्रामसभेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान/विधाने चूकीचे आहे ?
अ) ग्रामसभा स्थापन करण्यामागचा उद्देश ग्रामीण जनतेला एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक महत्त्वाच्या विषयाची चर्चा करणे.
ब) ग्रामसभेची बैठक आयोजित करण्याची वैधानिक जबाबदारी ग्रामसेवकाची आहे.
क) ग्रामसभेद्वारे ग्रामीण जनतेला आपले विचार, मते आणि तक्रारी व्यक्त करण्याची संधी दिली जाते.
योग्य पर्याय निवडा.
(ASO Mains 2022)

12 / 67

Category: ग्रामपंचायत

12. ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
(STI पूर्व 2011)

13 / 67

Category: ग्रामपंचायत

13. योग्य जोड्या जुळवा.
स्तंभ अ
अ) सरपंच
ब) कलम 40
क) कलम 243
ड) उपसरपंच
स्तंभ ब
1) ग्रामपंचायती संघटन
2) ग्रामसभेची व्याख्या
3) ग्रामसभेचा अध्यक्ष
4) सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत बैठकीचा अध्यक्ष
(ASO पूर्व 2014)

14 / 67

Category: ग्रामपंचायत

14. गावातून गोळा केलेल्या जमीन महसूलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो ?
(ASO मुख्य 2013)

15 / 67

Category: ग्रामपंचायत

15. दोन वा अधिक गावासाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला गटग्रामपंचायत असे म्हणतात, त्याकरिता प्रत्येक गावाची किती लोकसंख्या असावी लागते ?
(ASO मुख्य 2014)

16 / 67

Category: ग्रामपंचायत

16. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?
(STI पूर्व 2011)

17 / 67

Category: ग्रामपंचायत

17. ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात ?
(PSI पूर्व 2011)

18 / 67

Category: ग्रामपंचायत

18. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव - - - - - दिलेले आहे ?
(PSI पूर्व 2011)

19 / 67

Category: ग्रामपंचायत

19. पुढील विधाने वाचून योग्य विधानांची पर्यायातून निवड करा.
अ) गावातील सर्व प्रौढ स्त्री-पुरुष नागरिकांची ग्रामसभा बनते.
ब) 74 व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेची तरतूद केली आहे.
क) पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायतीचे सरपंच भूषवितात.
ड) ग्रामसभेची बैठक वर्षातून दोन वेळा बोलवणे आवश्यक आहे.
(Tax Asst. 2022)

20 / 67

Category: ग्रामपंचायत

20. खालील विधाने विचारात घ्या :
अ) मुंबई ग्राम पंचायत अधिनियम, 1958 मधील कलम 6 मध्ये ग्रामसभेची तरतुद आहे.
ब) 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यातील कलम 243 अनुसार ग्राम सभेला संवैधानिक अधिकार आहेत.
क) ग्राम सभेला निवडणूक नसते.
ड) ग्राम पंचायतचे सर्व मतदार हे ग्राम सभेचे सभासद असतात.
वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?
(Clerk 2018)

21 / 67

Category: ग्रामपंचायत

21. गावचा पोलीस पाटील ……- - - - - - कडून नियुक्त केला जातो.
(PSI पूर्व 2011)

22 / 67

Category: ग्रामपंचायत

22. नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका भरविण्याचा अधिकार कोणास आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

23 / 67

Category: ग्रामपंचायत

23. ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते ?
(PSI पूर्व 2013)

24 / 67

Category: ग्रामपंचायत

24. महाराष्ट्रात एका वित्तिय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

25 / 67

Category: ग्रामपंचायत

25. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्टये गैरलागू ठरते ?
(PSI पूर्व 2013)

26 / 67

Category: ग्रामपंचायत

26. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

27 / 67

Category: ग्रामपंचायत

27. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती?
अ) घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामंपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत.
ब) गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.
क) विविध योजनांच्या अंमलबावणीसाठी राज्यशासन त्यांना अनुदान देते.
योग्य पर्याय निवडा :
(STI पूर्व 2016)

28 / 67

Category: ग्रामपंचायत

28. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958, कलम 10 नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी - - - - - - व जास्तीत जास्त - - - - - - इतकी असते.
(राज्यसेवा मुख्य 2019)

29 / 67

Category: ग्रामपंचायत

29. खालील विधानांचा विचार करा :
अ) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो.
ब) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदास आरक्षण असते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(ASO पूर्व 2014)

30 / 67

Category: ग्रामपंचायत

30. राज्यशासन खालीलपैकी कोणत्या कारणास्तव ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते ?
अ) ग्रामपंचायत आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करणे.
ब) ग्रामपंचायत आपले कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही.
क) ग्रामपंचायत पंचायत समितीने दिलेल्या आदेशांचे पालन करीत नाही.
ड) ग्रामपंचायत मधील अर्ध्यापेक्षा अधिक जागा रिक्त आहे.
योग्य विधान/ने निवडा.
(वनसेवा मुख्य 2019)

31 / 67

Category: ग्रामपंचायत

31. ग्रामसभेच्या बैठकांबाबतच्या खालील विधानांचा विचार करा:
अ) एका आर्थिक वर्षात कमीत कमी चार बैठका घेणे.
ब) दोन बैठकी दरम्यान जास्तीत जास्त चार महिन्यांचे अंतर
क) सरपंच व त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलावू शकतो.
ड) ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदांची बैठक घेणे.
बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.
(PSI पूर्व 2013)

32 / 67

Category: ग्रामपंचायत

32. खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

33 / 67

Category: ग्रामपंचायत

33. खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही?
(ASO मुख्य 2013)

34 / 67

Category: ग्रामपंचायत

34. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते?
(STI पूर्व 2011)

35 / 67

Category: ग्रामपंचायत

35. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती?
(ASO मुख्य 2013)

36 / 67

Category: ग्रामपंचायत

36. महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती ?
(ASO पूर्व 2014)

37 / 67

Category: ग्रामपंचायत

37. खालील विधाने विचारात घ्या.
अ) एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की, उच्च न्यायालय निवडणूक कार्यवाही थांबविण्यासाठी किंवा नव्याने निवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकत नाही.
ब) उच्च न्यायालय ग्राम पंचायतीचा निवडणूक निकाल घोषित करण्यात येऊ नये असा निवडणूक अधिकाऱ्यास निर्देश देऊ शकते.
(राज्यसेवा मुख्य 2014)

38 / 67

Category: ग्रामपंचायत

38. खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही?
(संयुक्त गट 'क' पूर्व 2022)

39 / 67

Category: ग्रामपंचायत

39. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?
(STI पूर्व 2012)

40 / 67

Category: ग्रामपंचायत

40. खालील विधाने विचारात घ्या :
अ) ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव, त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल.
ब) ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या दोन- तृतीयांश इतक्या सदस्यांनी पाठींबा दिलेल्या ठरावा खेरीज, इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही.
(Combine 'B' 2020)

41 / 67

Category: ग्रामपंचायत

41. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?
(STI पूर्व 2011)

42 / 67

Category: ग्रामपंचायत

42. खालील विधाने विचारा घ्या :
अ) ग्रामपंचायत हे ब्रिटीशांच्या काळापासूनच स्थानिक प्रशासनाचे एकक होते, परंतु त्यांना शासकीय नियंत्रणाखाली काम करावे लागत असे.
ब) भारत सरकार अधिनियम 1919 मध्ये 'स्थानिक स्वशासना' बाबत कायदे करण्याचा अधिकार खास करुन प्रांतिक विधिमंडळास प्रांतिक वैधानिक यादीतील नोंद. क्र. 12 अन्वये दिला होता.
क) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 41 अन्वये राज्य ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाय योजना करील.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य 2018)

43 / 67

Category: ग्रामपंचायत

43. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत ?
अ) ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते.
ब) ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.
क) ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव म्हणूनही काम करतो.
ड) त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते.
ई) तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो.
(ASO पूर्व 2015)

44 / 67

Category: ग्रामपंचायत

44. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमातील 'ग्राम विकास समित्या' संबंधीच्या तरतूदी बाबत विधाने विचारात घ्या :
अ) ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या सातपेक्षा कमी नसेल आणि सतरा पेक्षा जास्त नसेल.
ब) ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी एक तृतीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्राम पंचायतीच्या सदस्यांमधील असतील.
क) तिच्या सदस्यांपैकी एक द्वितीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील.
ड) उप सरपंच हा तिचा पद्सिद्ध अध्यक्ष असेल.
ई) ग्रामसेवक हा तिचा पद्सिद्ध सदस्य-सचिव असेल.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
(Combine 'B' 2021)

45 / 67

Category: ग्रामपंचायत

45. कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते ?
(PSI पूर्व 2013)

46 / 67

Category: ग्रामपंचायत

46. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या "व्हीलेज फंडाची" संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे ?
(Agri 2012)

47 / 67

Category: ग्रामपंचायत

47. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
(PSI पूर्व 2013)

48 / 67

Category: ग्रामपंचायत

48. महाराष्ट्रात जमीनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करुन देणारा शासकीय कर्मचारी कोण ?
(राज्यसेवा पूर्व 2012)

49 / 67

Category: ग्रामपंचायत

49. खालील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) ग्राम न्यायालय कायदा 2008 अन्वये पंचायती राज संस्थांच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्राम न्यायालय स्थापन करावयाचे आहे जेणेकरून लोकांना विनासायास न्याय मिळेल.
ब) महाराष्ट्रात आतापावेतो 10 ग्राम न्यायालय अधिसूचित झाले आहेत ज्यातील 9 कार्यान्वित झाले आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2014)

50 / 67

Category: ग्रामपंचायत

50. ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत खालील विधानांचा विचार करा:
अ) तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ब) ग्रामपंचायतीच्या बैठका बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवितो.
क) ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो.
ड) अकार्यक्षमता, अयोग्यवर्तन व भ्रष्टाचार या कारणावरुन जिल्हापरिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करु शकते.
वरील पैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?
(PSI पूर्व 2014)

51 / 67

Category: ग्रामपंचायत

51. खालील विधाने विचारात घ्या :
अ) ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित, अभिरक्षेत ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते.
ब) प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत भरवली पाहिजे.
(Combine 'B' 2020)

52 / 67

Category: ग्रामपंचायत

52. खालील विधाने विचारात घ्या :
अ) सरपंचाचे (ज्याची निवड ग्राम पंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे) अथवा उपसरपंचाचे, रिक्त (राजीनाम्यामुळे) झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीस दिवसांच्या आत भरले पाहिजे.
ब) थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीन महिन्यांच्या आत भरले पाहिजे.
क) ग्राम पंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्राम पंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हां निवडून येण्यास पात्र नसतो.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(Combine 'B' 2021)

53 / 67

Category: ग्रामपंचायत

53. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958' नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही?
(PSI पूर्व 2013)

54 / 67

Category: ग्रामपंचायत

54. सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून - - - - - - कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.
(PSI मुख्य 201

55 / 67

Category: ग्रामपंचायत

55. भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ?
(PSI पूर्व 2012)

56 / 67

Category: ग्रामपंचायत

56. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (RGSA) काय आहे ?
(Combine 'B' 2020)

57 / 67

Category: ग्रामपंचायत

57. सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते?
(राज्यसेवा मुख्य 2014)

58 / 67

Category: ग्रामपंचायत

58. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार - - - - - - च्या 'मुंबई ग्रामपंचायत कायदा' व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो.
(STI पूर्व 2012)

59 / 67

Category: ग्रामपंचायत

59. ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे ?
(ASO मुख्य 2015)

60 / 67

Category: ग्रामपंचायत

60. ग्राम विकास समिती' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
(Forest मुख्य 2016)

61 / 67

Category: ग्रामपंचायत

61. गावातुन गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामंपंचायतीला मिळतो ?
(Asst. पूर्व 2012)

62 / 67

Category: ग्रामपंचायत

62. खालील विधाने विचारात घ्या :
अ) ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.
ब) पंचायतीचा सचिव हा ग्रामसभेचा सचिव असतो.
क) ग्रामसेवक हा 'बालविवाह प्रतिबंधक अधिकारी' देखील असतो.
ड) ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सेवक असून त्याचे वेतन आणि भत्ते जिल्हा निधितून दिले जातात.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
(Forest मुख्य 2017)

63 / 67

Category: ग्रामपंचायत

63. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?
(STI पूर्व 2011)

64 / 67

Category: ग्रामपंचायत

64. ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार ……- - - - - - पाहतात.
(PSI मुख्य 2011)

65 / 67

Category: ग्रामपंचायत

65. खालील विधाने विचारात घ्या : (महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या संदर्भात)
अ) ग्रामपंचायतीच्या सेवकांची नेमणूक पंचायत ठराव करून करते.
ब) पिताला कोणत्याही सेवकाला लेखी आदेशाद्वारे निलंबित अथवा बडतर्फ करता येईल.
क) पंचायतीने दिलेल्या अशा कोणत्याही आदेशाविरुद्ध सेवकाला 15 दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अपील करता येईल.
ड) ग्रामपंचायतीच्या सेवकांचे वेतन हे पंचायत समिती फंडातून दिले जाते.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(ASO Mains 2022)

66 / 67

Category: ग्रामपंचायत

66. ग्राम पंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ?
(ASO पूर्व 2011)

67 / 67

Category: ग्रामपंचायत

67. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(Combine 'B' 2019)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top