मौजेबारी, कायमधारा आणि रयतवारी या तीनही जमीन महसुल निश्चिती पद्धतींचा एल्फिन्स्टनने सुरु केलेल्या पद्धतीमध्ये समन्वय होता. मौजेबारीमध्ये महसूल गावाच्या एकूण उत्पन्नातून मोजला जात होता, कायमधारा मध्ये दरवर्षी एक निश्चित रक्कम आकारली जात होती, तर रयतवारी मध्ये दर एकरामागील महसूल प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून वसूल केला जात होता.