16

Polity

राज्यपाल

1 / 81

Category: राज्यपाल

1. राज्याच्या राज्यपालाची नेमणूक करण्याकरिता सरकारीया आयोगाने कोणते निकष सुचविले आहेत ?
अ) काही क्षेत्रात तो तज्ञ असला पाहिजे.
ब) ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी.
क) ती व्यक्ती राजकारणाशी विशेषतः अलिकडच्या काळात संबंधित नसावी.
ड) ती व्यक्ती स्थानिक राजकारणाशी जवळून संबंधित असावी.
(राज्यसेवा मुख्य 2013)

2 / 81

Category: राज्यपाल

2. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही?
(ASO मुख्य 2017)

3 / 81

Category: राज्यपाल

3. 'राज्यपाल' संदर्भात खालील जोड्या जुळवा :
(कलमें)
अ) कलम-154
ब) कलम-155
क) कलम-157
ड) कलम-158
(तरतुदी)
1) तो वयाची 35 वर्षे पूर्ण केलेला असावा.
2) राज्यपाल संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा अथवा कोणत्याही राज्याचे विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही.
3) राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालामध्ये विहीत असेल.
4) भारताचे राष्ट्रपतीकडून राज्यपालाची नेमणूक केली जाईल.
(ASO मुख्य 2016)

4 / 81

Category: राज्यपाल

4. खालील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) राज्यपालांच्या पॉकेट व्हेटो अधिकाराने शासनाचे विधेयक नाकाग्ल्या जाते.
ब) राज्यपालाना पॉकेट व्हेटो वापरण्याचा अधिकार अनुच्छेद 156 खाली प्रदान आहे
(राज्यसेवा मुख्य 2014)

5 / 81

Category: राज्यपाल

5. राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही ?
(STI मुख्य 2015)

6 / 81

Category: राज्यपाल

6. राज्यपालाच्या अधिकार व कार्यासंबंधी खालीलसंबंधी कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ) राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलविण्याचे कार्य राज्यपाल करतात.
ब) राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायधिशांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
क) विधानसभेच्या निवडणू कीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल विधीमंडळात अभिभाषण करतात.
योग्य पर्याय निवडा.
(ESI Mains 2019)

7 / 81

Category: राज्यपाल

7. खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

8 / 81

Category: राज्यपाल

8. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे.
ब) मुख्यमंत्री हा राज्य शासनाचा प्रमुख आहे.
क) सचिव हा राज्याचा प्रशासकीय प्रमुख आहे.
(Tax Asst. 2016)

9 / 81

Category: राज्यपाल

9. जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन - - - - -
(राज्यसेवा मुख्य, 2022)

10 / 81

Category: राज्यपाल

10. राज्यपालांच्या न्यायालयीन अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) ते जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणूका आणि बढत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात.
ब) राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती त्यांचा सल्ला घेतात.
क) ते फाशीची शिक्षा माफ करू शकत नाहीत परंतु ते त्या शिक्षेचे अन्य स्वरूपाच्या शिक्षेत रूपांतर करू शकतात.
(Excise-PSI मुख्य 2017)

11 / 81

Category: राज्यपाल

11. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहे/त?
अ) अनुच्छेद- 201 मध्ये यासंबंधीच्या तरतूदी आहेत.
ब) हा राज्यपालांचा विवेकाधिकार नाही.
क) जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर हे अनिवार्य आहे.
ड) विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतची तरतूद ही जम्मू आणि काश्मीर राज्यास देखील लागू आहे.
(राज्यसेवा मुख्य 2019)

12 / 81

Category: राज्यपाल

12. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही ?
(Tax Asst. 2016)

13 / 81

Category: राज्यपाल

13. राज्याच्या राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात.
ब) ते राज्य विधिमंडळाच्या बैठका स्थगित करू शकतात.
क) ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधिमंडळास संदेश पाठवू शकतात.
ड) जर विधेयक मार्गदर्शक तत्त्वाविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवू शकतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(ASO मुख्य 2017)

14 / 81

Category: राज्यपाल

14. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - - - - - कडून नियुक्त केले जातात.
(PSI पूर्व 2011)

15 / 81

Category: राज्यपाल

15. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी दिवस नेमून दिला असला तरीही :
अ) विधेयक किंवा विधेयके मांडण्याची परवानगी मिळविण्यासाठी एक किंवा अनेक प्रस्ताव आणता येतील आणि अशा दिवशी विधेयक किंवा विधेयके मांडता येतील.
ब) विधानसभेने राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू करण्यापूर्वी किंवा ती पुढे चालू करण्यापूर्वी औपचारिक स्वरूपाचे इतर कामकाज करता येईल.
(राज्यसेवा मुख्य 2014)

16 / 81

Category: राज्यपाल

16. खालील विधाने विचारात घ्या :
अ) जर राज्यपालाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार अथवा अन्य मार्गाने राष्ट्रपतीचे समाधान झाले की राज्यशासन राज्यघटनेनुसार चालत नाही तर ते राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात.
ब) राष्ट्रपतीचे समाधान म्हणजे केंद्र सरकारचे समाधान.
क) राष्ट्रपती राजवट ही प्रत्यक्षात केंद्र सरकारची राजवट असते.
ड) राज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाने (NCRWC) अनुच्छेद 356 हे वगळण्यात यावे अशी शिफारस केली होती.
(Tax Asst. 2016)

17 / 81

Category: राज्यपाल

17. “एक हॉटेल चालविणे आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे" राज्यपालाच्या कार्याचे अशाप्रकारे वर्णन कोणी केले?
(राज्यसेवा मुख्य 2015)

18 / 81

Category: राज्यपाल

18. राज्यपालाचे अधिकार व अधिकार प्रदान करणारी कलमे यांची जुळणी करा :
अ) विधान सभेत अँग्लो-इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात.
ब) राज्यसरकाचे वार्षिक अंदाजपत्रक विधान सभेपूढ़े सादर करण्यास सांगणे
क) विधानसभेत अर्थविधेयके मांडण्याची शिफारस करणे.
ड) त्याला 'दया दाखविण्याचा विशेषाधिकार' आहे.
1) 161 2) 207
3) 202 4) 333
(PSI पूर्व 2014)

19 / 81

Category: राज्यपाल

19. खालील विधानांपैकी कोणते विधान/ने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे/त ?
अ) राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ति ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे.
ब) देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लीम असला पाहिजे.
क) संसदच्या लोकलेखा समितिचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे.
(राज्यसेवा पूर्व 2019)

20 / 81

Category: राज्यपाल

20. राज्यपालाच्या निवडीसाठी खालीलपैकी पात्रतेचे निकष कोणते आहे/त ?
अ) तो भारताचा नागरिक असावा.
ब) वयाची कमीत कमी 35 वर्षे पूर्ण असावीत.
क) संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधीमंडळाचे सदस्य नसावे ..
योग्य उत्तर निवडा :
(करसहाय्यक मुख्य 2017)

21 / 81

Category: राज्यपाल

21. खालील विधाने विचारात घ्या.
अ) राज्यपाल हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात.
ब) राज्यपाल हे केंद्र किंवा राज्य विधीमंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे.
क) राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपुर्द करतात.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(STI मुख्य 2019)

22 / 81

Category: राज्यपाल

22. खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही.
ब) राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते.
क) राज्यपालास केंव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो.
ड) राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही.
(Combine 'C' 2019)

23 / 81

Category: राज्यपाल

23. राज्याच्या राज्यपालाच्या अधिकारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, संस्थगित आणि विसर्जित करू शकतात.
ब) राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठक स्थगित करू शकतात.
क) राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात.
वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
(ASO Mains 2022)

24 / 81

Category: राज्यपाल

24. खालील जोड्या जुळवा.

अ) कलम - 155
ब) कलम - 156
क) कलम - 157
ड) कलम - 159

1) राज्यपाल नियुक्ती
2) राज्यपाल पदाचा कार्यकाळ
3) राज्यपाल पदासाठी पात्रता
4) राज्यपाल पदाची शपथ
(Clerk Mains 2022)

25 / 81

Category: राज्यपाल

25. "राज्यपाल हे संविधानाचे औचित्यपूर्वक रखवालदार असून ते एका शृंखलासमान आहेत ज्याद्वारे राज्याला केंद्राबरोबर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात. "हे विधान कोणाचे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

26 / 81

Category: राज्यपाल

26. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(PSI Mains 2022)

27 / 81

Category: राज्यपाल

27. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो ?
(ASO मुख्य 2013)

28 / 81

Category: राज्यपाल

28. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत ?
अ) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.
ब) राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
क) राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षांसाठी असते.
ड) दुसरी व्यक्ती पद स्विकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.
(Combine 'B' पूर्व 2022)

29 / 81

Category: राज्यपाल

29. जोड्या लावा.
अ) अनुच्छेद-156 ब) अनुच्छेद-154
क) अनुच्छेद-153 ड) अनुच्छेद-155

1) राज्यपालांचे कार्यकारी अधिकारी
2) राज्यपालांचा कालावधी
3) राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार
4) राज्यपाल पद
5) राज्यपालांची नियुक्ती
(MES 2018)

30 / 81

Category: राज्यपाल

30. महाराष्ट्राच्या राज्यापालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2019)

31 / 81

Category: राज्यपाल

31. "प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रचना ही विखुरली जाईल."
वरील वाक्य खालीलपैकी एकाने राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले आहे.
(राज्यसेवा मुख्य 2013)

32 / 81

Category: राज्यपाल

32. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?
(PSI पूर्व 2013)

33 / 81

Category: राज्यपाल

33. राज्यपालांच्या संबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे
(ASO Mains 2022)

34 / 81

Category: राज्यपाल

34. राज्यपाल वटहुकूम कोणत्या परिस्थितीत पारित करू शकतात ?
अ) जेव्हा एखाद्या कायद्याची परिस्थितीवश निकड निर्माण झाली असेल, परंतु ती पूर्ण करण्यासाठी राज्यविधीमंडळाचे अधिवेशन सुरू नसते.
ब) राज्यविधीमंडळाचे अधिवेशन सुरू असेल तरी एखाद्या कामाची परिस्थितीवश निकड निर्माण झाली असेल तर ती पूर्ण करण्याकरिता.
क) जेव्हा त्यांना आवश्यक वाटते.
ड) जेव्हा भारताचे राष्ट्रपती तसे करण्याचे निर्देश देतात.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

35 / 81

Category: राज्यपाल

35. खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2017)

36 / 81

Category: राज्यपाल

36. खालीलपैकी कोणता राज्याच्या राज्यपालाचा स्व-विवेकाधीन अधिकार नाही ?
(STI मुख्य 2014)

37 / 81

Category: राज्यपाल

37. यादी अ व यादी ब यांच्या जोडी जुळवून खाली दिलेल्या संकेतांतून अचूक संकेत निवडा:
यादी 'अ'
अ) कलम 156
ब) कलम 154
क) कलम 153
ड) कलम 155
यादी 'ब'
1) राज्याचा कार्यकारी अधिकारी
2) राज्यपालांचा कार्यकाल
3) राज्यपालांची नियुक्ती
4) राज्यांचे राज्यपाल
5) विशिष्ट परिस्थितीमध्ये पार पाडण्याची राज्यपालांची कार्ये
(Forest मुख्य 2017)

38 / 81

Category: राज्यपाल

38. योग्य कथन/कथने ओळखा.
अ) राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपती द्वारे निर्वाचित केले जातात.
ब) राज्यपाल हे महाभियोग प्रक्रिये द्वारे पदच्युत केले जातात.
क) राज्यपाल हे कोणतेही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाही.
(STI मुख्य 2017)

39 / 81

Category: राज्यपाल

39. राज्यपालाच कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुक आहे ?
(ASO पूर्व 2014)

40 / 81

Category: राज्यपाल

40. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
(ASO मुख्य 2013)

41 / 81

Category: राज्यपाल

41. खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढमताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती.
ब) राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडीयन पद्धत स्विकारली.
क) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

42 / 81

Category: राज्यपाल

42. "आपण जे संविधान तयार करतो आहोत त्यात जरी त्याला फारच कमी अधिकार दिले असले तरी एखादा राज्यपाल गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो. "संविधान सभेतील हे विधान कोणाचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

43 / 81

Category: राज्यपाल

43. राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे :
(राज्यसेवा मुख्य 2016)

44 / 81

Category: राज्यपाल

44. सध्या, राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात ?
अ) ते विधान परिषदेवर एक-बारांश सभासद नामनिर्देशित करू शकतात.
ब) ते अँग्लो-इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधान सभेवर नामनिर्देशित करू शकतात.
क) ते राज्याच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरूध्द केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तिला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी देवू शकतात.
ड) ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत पाठवू शकतात.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

45 / 81

Category: राज्यपाल

45. राज्यपालाचा कार्यकाल हा सामान्यपणे पाच वर्षांचा असतो. मात्र तत्पूर्वी ता संपुष्टात येऊ शकता.
अ) पंतप्रधान यांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकड़न बड़तर्फी
ब) मुख्यमंत्रांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकड़न बडतर्फी.
क) सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधिशाच्या मल्ल्यान राष्ट्रपतीकडून बडतर्फी.
(राज्यसेवा मुख्य 2014)

46 / 81

Category: राज्यपाल

46. भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये (Order of Precedence) राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

47 / 81

Category: राज्यपाल

47. राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायधीशांची नेमणूक करतात.
ब) राज्यपाल राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुची नियुक्ती करतात.
क) राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री नियुक्त करतात.
ड) राज्यपाल राज्यांच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI Mains 2022)

48 / 81

Category: राज्यपाल

48. खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यघटनेतील कलम 161 नुसार राज्यपालास देखील दयेचा अधिकार आहे.
ब) राज्यपाल देखील राज्याच्या कायद्याविरोधातील गुन्हेगारास क्षमा करणे, शिक्षेत सूट देणे, कमी करणे, स्थगित करणे इ. प्रकारे दया दाखवू शकतो.
क) राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघेही कोर्ट मार्शल झालेल्यांना दया दाखवू शकतात.
ड) राष्ट्रपती देहदंडाची शिक्षा माफ करू शकतात मात्र अशा स्वरुपाचा अधिकार राज्यपालाला नाही.
(ASO मुख्य 2015)

49 / 81

Category: राज्यपाल

49. राज्यपालांच्या नेमणूकीसंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) नाथ पै यांनी सुचविले होते की, नेमणूकीस संसदेच्या मान्यतेची अट असावी.
ब) सेटलवाड अभ्यास गट अशा मताचा होता की याबाबतीत मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करावी.
क) अटल बिहारी वाजपेयी यांनी सुचविले होते की मुख्यमंत्र्यांपुढे नावाची यादी ठेवून त्यातील एकाची निवड करण्यास सांगावे.
(राज्यसेवा मुख्य 2013)

50 / 81

Category: राज्यपाल

50. अरुणाचल प्रदेशामध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा :
विधान(A) : राज्याच्या राज्यपालांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची शिफारस न्यायालयीन चिकित्सेच्या कक्षेत येत नाही.
कारण (R) : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 361 नुसार राज्यपालांनी त्यांच्या कार्यकक्षेत राहून केलेल्या कृतीला कायदेशीर कारवाई पासून संरक्षण दिले गेले आहे.
(Forest पूर्व 2016)

51 / 81

Category: राज्यपाल

51. ...... व्या घटनादुरुस्तीनुसार, राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधान सभेत आवश्यक असल्यास करू शकतात.
(राज्यसेवा मुख्य 2016)

52 / 81

Category: राज्यपाल

52. राज्यपालपदाबाबत 'सरकारिया, आयोगाने' खालीलपैकी कोणत्या सूचनेची शिफारस केली नव्हती?
(Forest मुख्य 2014)

53 / 81

Category: राज्यपाल

53. खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यापालांची निवड विशेष निर्वाचन मंडळाकडून अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते.
ब) राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.
क) साधारणतः राज्यापालांची नियुक्ती पाच वर्षांसाठी केली जाते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(वनसेवा मुख्य 2019)

54 / 81

Category: राज्यपाल

54. राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे.
ब) ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकूम काढू शकतात.
क) ते वटहुकूम कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात.
ड) काही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सुचनांशिवाय वटहुकूम काढू शकत नाहीत.
वरीलैपकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(PSI मुख्य 2017)

55 / 81

Category: राज्यपाल

55. एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त असेल तर त्यांना द्यावयाची वित्तलब्धी आणि भत्ते खालीलप्रमाणे दिले जातात :
(ASO Mains 2022)

56 / 81

Category: राज्यपाल

56. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
(PSI पूर्व 2012)

57 / 81

Category: राज्यपाल

57. 'राज्यपाल' पदाबाबतच्या तरतुदींची, कलमे/घटना दुरुस्त्यांशी जुळणी करा :

अ) घटक राज्याकरिता राज्यपाल पदाची तरतूद
ब) राष्ट्रपतीकडून नेमणूक
क) एका व्यक्तीची दोन किंवा अधिक घटक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते
ड) भारताच्या राष्ट्रपतीकडून पदमुक्तता

1) कलम 156(1)
2) 7 वी घटनादुरुस्ती, 1956
3) कलम 155
4) कलम 153
(PSI Mains 2022)

58 / 81

Category: राज्यपाल

58. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो ?
अ) 5 वर्षे
ब) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
क) राज्यपालांची इच्छा असेपर्यंत
ड) मुख्यमंत्र्यांची इच्छा असेपर्यंत
(Assist. पूर्व 2012)

59 / 81

Category: राज्यपाल

59. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ) घटनेतील कलम 153 ते 167 ही राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित आहेत.
ब) कलम 153 अन्वये राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते.
क) 1978 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालाचे पद घटनात्मक आहे.
ड) 6 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956 अन्वये एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करता येईल.
(राज्यसेवा मुख्य 2017)

60 / 81

Category: राज्यपाल

60. राज्याचे राज्यपाल - - - - - असतात.
(Assist. पूर्व 2012)

61 / 81

Category: राज्यपाल

61. राज्यपाल पदाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते.
ब) राज्यपाल पदाचा कार्यकाळ पाच वर्षे आहे परंतु राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात.
क) राज्यपालांना कार्यकाळाची हमी नाही.
ड) राष्ट्रपतींच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देत येत नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(ASO मुख्य 2015)

62 / 81

Category: राज्यपाल

62. "राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे" असे विधान कोणी केले आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

63 / 81

Category: राज्यपाल

63. अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालाच्या अधिकारा संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) हा अधिकार अनुच्छेद 213 मध्ये नमूद केले आहेत.
ब) हा विवेकाधीन अधिकार आहे.
क) त्यांना हा अध्यादेश सहा आठवड्यांच्या आत मागे घेता येत नाही.
ड) राज्य विधीमंडळाने अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर सहा आठवड्यांचा निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही.
इ) हा अधिकार राज्य विधीमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकारा सारखाच आहे.
(राज्यसेवा मुख्य 2019)

64 / 81

Category: राज्यपाल

64. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

65 / 81

Category: राज्यपाल

65. कार्यकाळानुसार योग्य क्रमलावा (महाराष्ट्राचे राज्यपाल) :
अ) विजयालक्ष्मी पंडित
ब) डॉ. शंकर दयाल शर्मा
क) पी.सी. अलेक्झांडर
ड) पी.व्ही. चेरीयन
(ASO मुख्य 2019)

66 / 81

Category: राज्यपाल

66. योग्य कथन/कथने ओळखा.
अ) राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात.
ब) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात.
क) उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती राज्यपाल करतात.
(ASO मुख्य 2017)

67 / 81

Category: राज्यपाल

67. घटकराज्याचा 'संचीत निधी' सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?
(ASO मुख्य 2011)

68 / 81

Category: राज्यपाल

68. राज्य विधानमंडळाने मान्य केलेले सर्वसाधारण विधेयक जेव्हा राज्यपालांकडे पाठवले जाते, तेव्हा त्यांच्यापुढे खालील पर्याय असतात :
अ) ते विधेयकाला अनुमती देऊ शकतात.
ब) ते विधेयकाला अनुमती नाकारू शकतात.
क) राष्ट्रपतींच्या अनुमतीकरता विधेयक आरक्षित ठेऊ शकतात.
ड) राज्य विधानमंडळाकडे पुनर्विलोकनाकरिता विधेयक पाठवू शकतात.
इ) उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे त्यांच्या सल्ल्याकरिता विधेयक पाठवू शकतात.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य 2012)

69 / 81

Category: राज्यपाल

69. खालील जोड्या जुळवा.
अनुच्छेद
अ) 154 ब) 155
क) 156 ड) 157
विषय
1) राज्यपालाची नियुक्ती
2) राज्यपाल पदाचा कार्यकाळ
3) राज्यपाल म्हणून नियुक्तीचे पात्रता निकष
4) राज्याचे कार्यकारी अधिकार
(ESI Mains 2019)

70 / 81

Category: राज्यपाल

70. खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यपाल हे राज्यविधीमंडळचा भाग नाहीत.
ब) राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबंधित करण्याचा अधिकार आहे.
क) राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(ASO मुख्य 2015)

71 / 81

Category: राज्यपाल

71. राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकाराखाली खालीलपैकी कोणत्या बाबी येतात ?
अ) जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात.
ब) जेव्हा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात.
क) राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात.
ड) मंत्रिमंडळाने जर बहुमताचा पाठिंबा गमावल्याची त्यांची खात्री झाली तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात.
योग्य पर्याय :
(PSI Mains 2022)

72 / 81

Category: राज्यपाल

72. राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
अ) राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात.
ब) अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करू शकतात.
क) राज्याच्या मंत्रीमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
ड) एकदा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते, त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही.
(राज्यसेवा मुख्य 2018)

73 / 81

Category: राज्यपाल

73. जोड्या लावा.
विषय
अ) राज्यपाल पदाच्या अटी
ब) राज्यपालाचे विशेष अभिभाषण
क) माफी संबंधित राज्यपालाचे अधिकार
ड) राज्याच्या शासनाचे कामकाज चालविणे
कलम
1) 161 2) 158
3) 166 4) 176
(राज्यसेवा मुख्य 2017)

74 / 81

Category: राज्यपाल

74. योग्य विधान निवडा :
अ) राज्य विधी मंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा फक्त राज्यपाल वटहुकूम काढू शकतात.
ब) राज्यपाल कधीही वटहुकूम मागे घेऊ शकतात.
(Tech. Asst. 2013)

75 / 81

Category: राज्यपाल

75. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता ....... यांच्याकडे देण्यात आली आहे.
(संयुक्त गट 'क' पूर्व 2022)

76 / 81

Category: राज्यपाल

76. योग्य कथन/कथने ओळखा :
अ) राज्यपाल 1/12 सदस्य विधानपरिषदेत नियुक्त करू शकतात.
ब) राज्यपाल राज्य विधिमंडळाचे अंग असतात.
(ASO मुख्य 2013)

77 / 81

Category: राज्यपाल

77. - - - - - - हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.
(ASO पूर्व 2011)

78 / 81

Category: राज्यपाल

78. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) वित्त आयोगाची नेमणूक हे राज्यपालांचे कार्यकारी कर्तव्य आहे.
ब) नागरी खटल्यांपासून स्वतःची प्रतिरक्षा राज्यपालांचा स्वेच्छा अधिकार असतो.
(राज्यसेवा मुख्य 2015)

79 / 81

Category: राज्यपाल

79. राज्यपाल राज्याचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात त्याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) राष्ट्रपती-त्या विधेयकाला मान्यता द्यावी की परत पाठवावे हा निर्णय घेण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात.
ब) राष्ट्रपतींवर अनुमती दिली आहे किंवा अनुमती राखून ठेवल्याचे घोषित करण्यासाठी संविधानाने कोणतेही वेळेचे बंधन घातलेले नाही.
क) जर राज्य विधीमंडळाने तेच विधेयक दुसऱ्यांदा पारित केले तर त्यास राष्ट्रपतींनी मान्यता देणे त्यांच्यावर बंधनकारक असते.
(राज्यसेवा मुख्य 2016)

80 / 81

Category: राज्यपाल

80. खालीलपैकी कोणत्या राज्यपाल नियुक्त व्यक्तींना केवळ राज्यापालच पदावरून हटवू शकतात ?
अ) महाधिवक्ता
ब) राज्य वित्त आयोगाचे सदस्य
क) राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य
ड) राज्य विद्यापीठाचे कुलगुरु
(Forest मुख्य 2016)

81 / 81

Category: राज्यपाल

81. राज्यपाल कोणास जबाबदार असतो?
(ASO पूर्व 2011)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top