31

Polity

मूलभूत कर्तव्ये

1 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

1. नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहीत करण्यात आली आहेत ?
अ) ग्रामपंचायतीचे संगठन करणे.
ब) उत्पन्नातील विषमता कमी करणे.
क) देशाचे संरक्षण करणे.
ड) लष्करी सेवा बजावणे.
इ) समान नागरी कायदा निश्चित करणे.
फ) सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे.
(राज्यसेवा पूर्व 2017)

2 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

2. मुलभूत कर्तव्यांच्या संदर्भात कोणता/कोणते कथन असंगत आहे/आहेत ?
अ) मूळ संविधानात मुलभूत कर्तव्यांची तरतूद होती.
ब) 42 व्या घटनादुरूस्तीद्वारे मूळ राज्यघटनेत चौथा 'A' हा भाग जोडण्यात आला.
क) वर्ष 2002 मध्ये एक मुलभूत कर्तव्य आणखी जोडण्यात आला.
ड) प्रत्येक आई-वडील/पालक आपल्या 6 ते 14 वर्षा पर्यंतच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार.
(राज्यसेवा मुख्य 2022)

3 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

3. कोणत्या घटनादुरुस्तीन्वये 11 वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले ? (51A(K))
(संयुक्त गट 'क' पूर्व 2022)

4 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

4. भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?
(राज्यसेवा मुख्य 2014)

5 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

5. भारतीय राज्यघटनेनुसार, पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही ?
(Excise-PSI पूर्व 2017)

6 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

6. एका विशिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी पूरक ठरतील अशा सर्वोच्च न्यायालयापुढील 138 निवाड्यांचा उल्लेख कर्तव्यांविषयीच्या वर्मा आयोगाने केला आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख यासंदर्भात समितीने केला आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

7 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

7. 2002 च्या 86 व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले आहे?
(Tech. Assist. गट क 2016)

8 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

8. "भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे” हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे ?
(कंबाइन गट 'क' पूर्व 2022)

9 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

9. 'मूलभूत कर्तव्या' बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.
अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.
ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.
क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग 4 अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.
ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

10 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

10. भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत ?
अ) सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करणे.
ब) व्यक्तीगत आणि सामुहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे.
क) सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे.
ड) शास्त्रीय वृत्ती विकसित करणे.
(PSI मुख्य 2017)

11 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

11. खालील विधाने विचारात घ्या :
अ) सरदार स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून 42 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली.
ब) 2006 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीद्वारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनास बंधनकारक केले गेले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

12 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

12. भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2012)

13 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

13. खालील विधाने लक्षात घ्या :
अ) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती कायद्याने राज्यघटनेत IV-A या विभागाचा समावेश करण्यात आला.
ब) ह्या विभागात कलम 51 A या एकमेव कलमाचा समावेश आहे.
क) ह्या घटनादुरुस्तीद्वारे नागरिकांच्या दहा मूलभूत कर्तव्यांची संहिता राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.
ड) 89 व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 51 A मध्ये आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

14 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

14. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहे/आहेत?
अ) नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ही 42 व्या भारतीय घटनादुरुस्तीद्वारे 1976 साली घटनेत समाविष्ट करण्यात आली.
ब) नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश करणारा जपान हा एकमेव देश आहे.
क) भारतीय राज्यघटनेतील कलम 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. अकरावे कर्तव्य 2002 मध्ये
केलेल्या 83 व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले.
(STI मुख्य 2016)

15 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

15. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
(ASO मुख्य 2014)

16 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

16. खालील विधाने विचारात घ्या :
अ) मूळच्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता.
ब) 1978 सालच्या 44 व्या घटनादुरुस्ती अन्वये 10 मलूभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
क) 2002 च्या 86 व्या घटनादुरुस्तीनुसार 11 व्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला.
ड) अवाहन केल्यास लष्करी सेवा करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असल्याचे राज्यघटनेत नमूद केले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(लिपिक व टंकलेखन मुख्य 2017)

17 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

17. खालील बाबींचा योग्य क्रम लावा - (मूलभूत कर्तव्ये)
अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे. ब) वैज्ञानिक दृष्टिकोण, मानवतावादाचा विकास करणे.
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे
ड) राष्ट्राची सेवा करणे
(राज्यसेवा मुख्य 2022)

18 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

18. खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही ?
(ASO मुख्य 2013)

19 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

19. खालीलपैकी कशाचा मूलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?
अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.
ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.
क) कमकुवत घटकांच्या विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.
ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.
(राज्यसेवा मुख्य 2015)

20 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

20. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?
(STI पूर्व 2011)

21 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

21. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला ?
(संयुक्त गट 'क' पूर्व 2022)

22 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

22. भारतीय राज्यघटनेच्या कलम मध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे.
(ASO मुख्य 2011)

23 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

23. खालील विधाने विचारात घ्या :
अ) मूलभूत कर्तव्यांची नोंद मूळ राज्यघटनेत करण्यात आली नव्हती.
ब) 1976 साली 42 व्या घटनादुरूस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांची नोंद राज्यघटनेत करण्यात आली.
क) 2001 साली 84 व्या घटनादुरूस्तीने अकराव्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI मुख्य 2017)

24 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

24. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला ?
(Assist. पूर्व 2012)

25 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

25. माता-पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वयोगटातील आपले अपत्य किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे" हे मूलभूत कर्तव्य कोणत्या संविधानदुरुस्ती कायद्याने संविधानात अंतर्भूत करण्यात आले?
(तांत्रिक सेवा पूर्व 2022)

26 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

26. योग्य कथन/कथने ओळखा.
अ) 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
ब) 86 व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये 11 वे कर्तव्य (K) समाविष्ट करण्यात आले.
(STI पूर्व 2016)

27 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

27. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यांत आलेला नाही?
अ) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे.
ब) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
क) राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची असल्याचे घोषित केलेली स्मारके, स्थळे आणि वस्तू यांचे संरक्षण.
ड) मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांच्या सेवन करण्यावर बंदी आणणे.
(ASO मुख्य 2019)

28 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

28. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
(Tax Asst. Mains 2019)

29 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

29. भारतीय राज्यघटनेत नमूद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?
अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे.
ब) स्त्रीयांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.
ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे. योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य 2012)

30 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

30. राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?
अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.
ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.
क) ही कर्तव्ये मूलभूत हक्कांना पूरक आहेत.
ड) समावेशामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.
वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे/आहेत ?
(PSI मुख्य 2013)

31 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

31. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे?
(Combine 'B' 2019)

32 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

32. योग्य क्रम लावा- (मूलभूत कर्तव्ये)
अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे.
ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे.
क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे.
ड) भारताच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करणे.
(ASO मुख्य 2014)

33 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

33. "मूलभूत कर्तव्याबाबत" खालील विधाने विचारात घ्या :
अ) त्यांचा समावेश 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत करण्यात आला आहे.
ब) त्यांचा समावेश कलम 51-A मध्ये करण्यात आला आहे.
क) ती न्यायविचारणीय आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त ?
(वनसेवा मुख्य 2019)

34 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

34. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?
(राज्यसेवा पूर्व 2013)

35 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

35. राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश..... या हेतूसाठी करण्यांत आला.
(Clerk 2018)

36 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

36. खालीलैपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(Tax. Asst. 2016)

37 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

37. खालीलपैकी कोणती मलूभूत कर्तव्ये नागरिकांसाठी सांगितली आहेत ?
अ) विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाचा विकास करणे.
ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करणे.
क) ग्रामपंचायतीचे गठन करणे.
ड) उत्पन्नावरील विषमता कमी करणे.
इ) देशाचे संरक्षण करणे.
फ) समान नागरी संहिता निश्चित करणे.
योग्य पर्याय निवडा.
(Forest मुख्य 2017)

38 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

38. खालील विधाने लक्षात घ्या :
अ) स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला.
ब) मूलभूत-कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.
क) केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधाने/ने बरोबर आहे/त?
(STI पूर्व 2014)

39 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

39. भारतीय राज्यघटनेचे कलम '51 अ' कशा संबंधी आहे ?
(STI पूर्व 2012)

40 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

40. मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा.
अ) सार्वभौमत्वाचे रक्षण
ब) राष्ट्रगीताचा सन्मान
क) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण
ड) वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती
(ASO मुख्य 2013)

41 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

41. मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
अ) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.
ब) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.
क) कर्तव्ये स्वतःहून लागू होत नाहीत.
ड) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणतः पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत ?
(PSI मुख्य 2012)

42 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

42. कोणत्या घटना दुरूस्ती/दुरूस्त्यामूलभूत कर्तव्याशी संबंधितआहे/आहेत ?
अ) 42 वी घटना दुरूस्ती
ब) 46 वी घटना दुरूस्ती
क) 86 वी घटना दुरूस्ती
ड) 88 वी घटना दुरूस्ती
(राज्यसेवा मुख्य, 2020)

43 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

43. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश .......... च्या शिफारशीवरून करण्यात आला.
(राज्यसेवा मुख्य 2012)

44 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

44. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य (कर्तव्ये) आहेत ?
अ) भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता यांचा आदर करणे व त्यांचे संरक्षण करणे.
ब) संविधानाचे पालन करणे तसेच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
क) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावाद, शोधक बुद्धी विकसित करणे.
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.
(STI मुख्य 2019)

45 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

45. मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती.
ब) 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.
क) सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतचे अकरावे कर्तव्य 86 व्या घटनादुरुस्तीने 2002 साली समाविष्ट करण्यात आले.
वरीलपैकी कोणती/ती विधाने/ने बरोबर आहे/त ?
(PSI पूर्व 2016)

46 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

46. खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय नागरिकांसाठीची मूलभूत कर्तव्ये 1976 मध्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.
ब) 42 व्या घटनादुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला.
क) सूरज सिंह समितीच्या शिफारशीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(Tax Asst. 2022)

47 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

47. खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे ?
(PSI मुख्य 2012)

48 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

48. 'मुलभूत कर्तव्या' बाबतच्या खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही ?
(ASO मुख्य 2018)

49 / 49

Category: मूलभूत कर्तव्ये

49. योग्य क्रम निवडा :
अ) भारताच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करणे.
ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे.
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे.
ड) संविधानाचा सन्मान करणे.
(STI मुख्य 2014)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top