11

पंचायतराज

जिल्हा परिषद

1 / 47

Category: जिल्हा परिषद

1. जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या - - - - - - एवढी असते.
(राज्यसेवा मुख्य 2016)

2 / 47

Category: जिल्हा परिषद

2. जिल्हा परिषदेची जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) जि.प. चा अध्यक्ष हा या समितीचा पद्सिद्ध अध्यक्ष असतो.
ब) जि.प. च्या सर्व विषय समित्यांचे सभापती हे या समितीचे पद्सिद्ध सदस्य असतात.
क) या समितीत जि.प. सदस्यांमधून अध्यक्षाद्वारे नामनिर्देशित झालेल्या पाच सदस्यांपैकी किमान तीन महिला सदस्या असाव्यात.
ड) उप मुख्य कार्यकारी अधिकारी हा या समितीचा पद्सिद्ध सचिव असतो.
इ) कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) जि.प. कार्यकारी अभियंता (लहान पाटबंधारे) जि.प. हे या समितीचे पद्सिद्ध सदस्य असून ते समितीच्या बैठकीत चर्चेत मतदानाच्या हक्कासह भाग घेवू शकतात.
(राज्यसेवा मुख्य 2022)

3 / 47

Category: जिल्हा परिषद

3. पंचायतीराज्यांच्या निर्मितीनंतर विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचे जिल्हा, हे केंद्र बनले. परिणामी,
अ) जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे.
ब) जिल्हाधिकाऱ्यांना अधिक काळ काम करावे लागत आहे.
क) जिल्हाधिकाऱ्यांच्या पारंपरिक कामांच्या बरोबर विकास कार्यक्रमांची भर पडल्याने कामाचा ताण प्रचंड वाढला आहे.
ड) जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा वाढली आहे.
वरीलपैकी कोणता/ती पर्याय बरोबर आहे/आहेत ?
(ASO मुख्य 2016)

4 / 47

Category: जिल्हा परिषद

4. एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे ?
(ASO मुख्य 2013)

5 / 47

Category: जिल्हा परिषद

5. पुढील विधाने पहा :
अ) प्रत्येक जिल्हा परिषदेला राज्य शासनाने नेमणूक केलेला एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
ब) जर एखाद्या जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारीस परत घेण्याकरता दोन-तृतीयांश मताधिक्याने कळविल्यास तसे करणे राज्य शासनास भाग पड़ते.
(STI पूर्व 2012)

6 / 47

Category: जिल्हा परिषद

6. जिल्हा परिषदेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

7 / 47

Category: जिल्हा परिषद

7. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी विशेष सभेत मतदानाचा हक्क असलेल्या किती सदस्यांच्या अनुमतीने राज्य सरकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सेवेतून परत बोलाविते ?
(ASO Mains 2022)

8 / 47

Category: जिल्हा परिषद

8. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेसारखी संस्था त्या त्या राज्यात कशी संबोधिली जाते ?
अ) जिल्हा परिषद - ओडिशामध्ये
ब) जिल्हा विकास परिषद - पंजाबमध्ये
क) महाकामा परिषद - पश्चिम बंगालमध्ये
वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

9 / 47

Category: जिल्हा परिषद

9. जिल्हाधिकाऱ्यांची विकासविषयक कार्ये आहेत
अ) अंधश्रद्धा निर्मूलन
ब) सामुदायिक प्रकल्पांमध्ये वृद्धि
क) निर्वासितांचे पुनर्वसन
ड) जनगणना करणे
(ASO मुख्य 2016)

10 / 47

Category: जिल्हा परिषद

10. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढ़ावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते ?
(ASO मुख्य 2013)

11 / 47

Category: जिल्हा परिषद

11. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

12 / 47

Category: जिल्हा परिषद

12. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत काय खरे नाही?
अ) या अधिनियमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 म्हणतात.
ब) तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे.
क) तो ग्रेटर मुंबईला लागू नाही.
(Asst. पूर्व 2012)

13 / 47

Category: जिल्हा परिषद

13. पुढीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा कौन्सिलर बनू शकतो ?
अ) एखाद्या व्यक्तीस न्यायालयाने मनस्थिती ढासळलेली म्हणून घोषित केले असल्यास ती व्यक्ती
ब) बहिरी-मुकी व्यक्ती पर्यायी उत्तरे
(Asst. पूर्व 2012)

14 / 47

Category: जिल्हा परिषद

14. जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात ?
अ) हव्या तितक्या वेळा.
ब) वर्षातून जास्तीत जास्त चार वेळा
क) दोन बैठकीतील अंतर 3 महिन्यांपेक्षा अधिक नको.
ड) दोन बैठकातील अंतर 4 महिन्यांपेक्षा अधिक नको.
(Asst. पूर्व 2012)

15 / 47

Category: जिल्हा परिषद

15. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) जिल्हा परिषदेची बैठक जेंव्हा आवश्यक असेल तेव्हा भरविता येईल परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत एक महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.
ब) जिल्हा परिषद अध्यक्ष एक-पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात.
क) प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान - अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थिती मध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे.
ड) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती मध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषविल.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(Combine 'B' 2021)

16 / 47

Category: जिल्हा परिषद

16. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची - - - - - बैठक महिन्यातून एकदा होते.
(PSI मुख्य 2011)

17 / 47

Category: जिल्हा परिषद

17. जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा.
(ASO मुख्य 2013)

18 / 47

Category: जिल्हा परिषद

18. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीमध्ये अनुसूचित जमातीचे कमीतकमी किती सभासद असतात?
(ASO मुख्य 2015)

19 / 47

Category: जिल्हा परिषद

19. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोडया जुळवा :
स्तंभ अ
अ) जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना
ब) गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक
क) पंचायत समिती सभापती व उप-सभापती यांचे अधिकार व कार्ये
ड) मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्ये
स्तंभ ब
1) कलम - 95
2) कलम -78
3) कलम - 97
4) कलम - 76
(संयुक्त गट ब 2018)

20 / 47

Category: जिल्हा परिषद

20. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकाबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
(राज्यसेवा पूर्व 2013)

21 / 47

Category: जिल्हा परिषद

21. योग्य कथने ओळखा.
अ) जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 50 ते 75 सदस्य असते.
ब) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासनाद्वारे होते.
क) जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.
ड) जिल्हा परिषदेची मुदत पाच वर्षे आहे.
(Tax Asst. Mains 2019)

22 / 47

Category: जिल्हा परिषद

22. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका - - - - - समितीची होय.
(PSI मुख्य 2011)

23 / 47

Category: जिल्हा परिषद

23. जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीच्या रचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
अ) जि.प अध्यक्ष हा या समितीचा पदसिद्ध सभापती असतो.
ब) सर्व विषय समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात.
क) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) हे पदसिद्ध सदस्य सचिव असतात.
ड) मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सदस्य असतात.
(राज्यसेवा मुख्य 2015)

24 / 47

Category: जिल्हा परिषद

24. जिल्हा परिषदेच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान (ने) बरोबर आहे (त) ?
अ) ग्रामीण आणि शहरी लोकांना अत्यावश्यक सेवा व सवलती पुरविणे आणि जिल्ह्यासाठी विकास कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
ब) शहरी भागात शाळा स्थापन करून त्या चालविणे.
क) ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व दवाखाने सुरू करणे.
(ASO Mains 2022)

25 / 47

Category: जिल्हा परिषद

25. जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात?
(ASO पूर्व 2011)

26 / 47

Category: जिल्हा परिषद

26. जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून भूमिका बजावतो. खालीलपैकी कोणकोणत्या भूमिका त्यास पार पाडाव्या लागतात ?
अ) जिल्ह्याचा प्रशासकीय अधिकारी
ब) जिल्हा महसूल अधिकारी
क) जिल्हा दंडाधिकारी
ड) जिल्हा निर्वाचन अधिकारी
य) शासनाचा जिल्हा प्रतिनिधी
(Tax Asst. 2015)

27 / 47

Category: जिल्हा परिषद

27. गैरवर्तन अथवा लज्जास्पद वर्तन केल्याबद्दल दोषी ठरलेल्या अथवा सदस्य म्हणून आपली कर्तव्ये बजावण्यास असमर्थ असल्यास जिल्हा परिषद सदस्यास पदावरून दूर करण्याचा अधिकार महाराष्ट्रात कोणास आहे?
(वनसेवा मुख्य 2019)

28 / 47

Category: जिल्हा परिषद

28. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्त्वाची ठरते कारण - - - - - -
(राज्यसेवा पूर्व 2012)

29 / 47

Category: जिल्हा परिषद

29. जर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या एखाद्या विशेष सभेत एकूण परिषद सदस्यांपैकी - - - - - - कमी नसेल इतक्या परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास अधिकार पदावरून परत बोलावण्याची राज्यशासनाकडे मागणी करणाऱ्या ठरावाच्या बाजूने मत दिल्यास राज्य शासन अज्ञा अधिकाऱ्यास परिषदेच्या सेवेतून परत बोलावून घेईल.
(ASO Mains 2022)

30 / 47

Category: जिल्हा परिषद

30. योग्य कथने ओळखा.
अ) उपविभागाचा प्रमुख उपविभागीय अधिकारी असतो.
ब) उपविभागीय अधिकारी यांना प्रशासकीय व न्यायिक कर्तव्य असतात.
क) अधिक धान्य उत्पादनाची योजना करणे, हे उपविभागीय अधिकाऱ्याचे प्रशासकीय कार्य आहे.
ड) उपविभागीय अधिकारी हे शस्त्र परवाना मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करतात.
(ASO मुख्य 2016)

31 / 47

Category: जिल्हा परिषद

31. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्या विरुद्ध अविश्वास ठरावाच्या बाबतीत कोणते विधान /विधाने चुकीचे आहेत?
अ) अविश्वासाच्या ठरावासाठी बोलविलेल्या सभेच्या अध्यक्षपदी फक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात.
ब) अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान 1/3 संख्या बळाने दाखल केला पाहिजे.
क) अविश्वास ठराव पारित होण्याकरिता एकूण सदस्यांच्या 2/3 संख्याबळाची गरज असते.
ड) महिला पदाधिकाऱ्याच्या विरूद्ध विशेष बाब म्हणून अविश्वास ठराव किमान 3/4 सदस्यांच्या संख्याबळाने पारीत करणे.
(ASO Mains 2022)

32 / 47

Category: जिल्हा परिषद

32. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
(PSI पूर्व 2012)

33 / 47

Category: जिल्हा परिषद

33. जोड्या लावा :
'A' (राज्य)
अ) आसाम
ब) कर्नाटक
क) मध्य प्रदेश
ड) अरुणाचल प्रदेश
'B' (जिल्हा परिषद/पंचायत समितीचे नांव)
1) अंचल समिती
2) महकमा परिषद
3) जिला विकास परिषद
4) जनपद पंचायत
(ASO Mains 2022)

34 / 47

Category: जिल्हा परिषद

34. खालील विधाने विचारात घ्या : (महाराष्ट्राच्या संदर्भात)
अ) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास जिल्ह्यातील कोणत्याही पंचायत समितीच्या सभांना हजर राहता येते.
ब) जिल्हा परिषदेतील वर्ग-एक आणि वर्ग-दोनच्या अधिकाऱ्यांना तीन महिन्यापर्यंत अनुपस्थिती रजा मंजूर करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास असतो.
क) जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत एकूण सदस्यांपैकी तीन- चतुर्थांश सदस्यांनी बहुमताने ठराव मंजूर केल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास राज्यशासन परत बोलावू शकते.
वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

35 / 47

Category: जिल्हा परिषद

35. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना ……- - - - - - मध्ये झाली.
(ASO पूर्व 2011)

36 / 47

Category: जिल्हा परिषद

36. जिल्हापरिषदांचे अधिकार व कामे आणि जिल्हापरिषदांची घटकराज्ये यांच्या जोड्या लावा.
स्तंभ अ
अ) पंचायती राज्य स्तरांत सर्वात प्रबळ असून नियोजन आणि विकास कामे करते.
ब) समन्वयक संस्था असून पंचायत कार्यावर देखरेख करते.
क) समितीविना असलेल्या विकास गटांमध्ये पंचायत समित्यांची कामे करते.
ड) ग्रामपंचायतींवर देखरेख करते.
स्तंभ ब
1) आंध्र प्रदेश
2) गुजरात
3) महाराष्ट्र
4) कर्नाटक
(Forest मुख्य 2014)

37 / 47

Category: जिल्हा परिषद

37. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

38 / 47

Category: जिल्हा परिषद

38. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला ?
(Agri पुर्व 2011)

39 / 47

Category: जिल्हा परिषद

39. जिल्हापरिषदांचे अधिकार व कामे आणि जिल्हापरिषदांची घटकराज्ये यांच्या जोड्या लावा.
स्तंभ अ
अ) पंचायती राज्य स्तरांत सर्वात प्रबळ असून नियोजन आणि विकास कामे करते.
ब) समन्वयक संस्था असून पंचायत कार्यावर देखरेख करते.
क) समितीविना असलेल्या विकास गटांमध्ये पंचायत समित्यांची कामे करते.
ड) ग्रामपंचायतींवर देखरेख करते.
स्तंभ ब
1) आंध्र प्रदेश
2) गुजरात
3) महाराष्ट्र
4) कर्नाटक
(Forest मुख्य 2015)

40 / 47

Category: जिल्हा परिषद

40. खालील विधाने विचारात घ्या :
अ) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विरुद्ध अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये साध्या बहुमताने मंजूर होतो.
ब) अशा तऱ्हेचा अविश्वास ठराव हा अध्यक्षाची निवड झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीपर्यंत आणता येत नाही.
क) अविश्वासाचा ठराव विचारात घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी असतो.
ड) अविश्वासाचा ठराव विचारात घेण्यासाठी बोलावण्यात आलेली विशेष सभा कोणत्याही कारणास्तव तहकुब होत नाही.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य 2018)

41 / 47

Category: जिल्हा परिषद

41. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

42 / 47

Category: जिल्हा परिषद

42. जिल्हा परिषदेमध्ये ……- - - - - - विषय समित्या असतात.
(राज्यसेवा मुख्य 2016)

43 / 47

Category: जिल्हा परिषद

43. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 नुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात?
(राज्यसेवा मुख्य 2020)

44 / 47

Category: जिल्हा परिषद

44. योग्य जोड्या जुळवा.
स्तंभ अ
अ) स्थायी समिती
ब) कृषी समिती
क) शिक्षण समिती
ड) समाज कल्याण समिती
स्तंभ ब
1) 11 सदस्य
3) 10 सदस्य
2) 8 सदस्य
4) 13 सदस्य
(राज्यसेवा मुख्य 2014)

45 / 47

Category: जिल्हा परिषद

45. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात?
(राज्यसेवा पूर्व 2011)

46 / 47

Category: जिल्हा परिषद

46. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात पदाधिकाऱ्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(राज्यसेवा पूर्व 2013)

47 / 47

Category: जिल्हा परिषद

47. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?
(PSI मुख्य 2011)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top