14

पंचायतराज

कटक मंडळे

1 / 15

Category: कटक मंडळे

1. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र हे :
अ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करीत असते.
ब) प्रत्येक निवडणूकीच्या अगोदर प्रभागांचे परिसीमन करण्याची जबाबदारी देखील आयोगावर आहे.
क) राज्यातील राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचे आणि नोंदणी रद्द करण्याचे अधिकार देखील आयोगाकडे आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2022)

2 / 15

Category: कटक मंडळे

2. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत ?
अ) कामठी
ब) देवळाली
क) सातारा
ड) खडकी
(ASO मुख्य 2015)

3 / 15

Category: कटक मंडळे

3. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कटक (छावणी) मंडळे अस्तित्वात आहे?
अ) औरंगाबाद
ब) नागपुर (कामठी)
क) अहमदनगर
ड) अमरावती (चांदूर रेल्वे)
(ASO मुख्य 2016)

4 / 15

Category: कटक मंडळे

4. भारतात कॅन्टोन्मेंट अॅक्ट कधी पास झाला?
(ASO Mains 2022)

5 / 15

Category: कटक मंडळे

5. छावणी मंडळाबाबत कोणते (ती) विधान (ने) सत्य आहेत.
अ) नागरी प्रशासनातील छावणी मंडळ ही व्यवस्था ब्रिटिश परंपरेचा वारसा (देणगी) आहे.
ब) संरक्षण मंत्रालयाने पारित केलेल्या ठरावाची ती एक रचना आहे.
क) संरक्षण मंत्रालयाचे त्यावर प्रत्यक्ष नियंत्रण असते.
ड) त्यात केवळ निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

6 / 15

Category: कटक मंडळे

6. खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
अ) छावणी क्षेत्र पालिकेत नऊ निर्वाचित सदस्य असतात.
ब) छावणी क्षेत्र पालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी संरक्षण मंत्र्याद्वारा नियुक्त केला जातो.
क) भारतात छावणी क्षेत्र पालिकांना तीन प्रकारात विभागले जाते.
ड) छावणी क्षेत्र पालिकेच्या उपाध्यक्षाची निवड पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी तिच्या सर्व निर्वाचित व नामनियुक्त सदस्यांकडून होते.
(राज्यसेवा मुख्य 2018)

7 / 15

Category: कटक मंडळे

7. छावणी क्षेत्रपालिकेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
(ASO Mains 2022)

8 / 15

Category: कटक मंडळे

8. खालील विधाने विचारात घ्या :
अ) छावणी कायदा-2006 ने आधीचा छावणी कायदा-1924 रद्द करण्यात आला.
ब) छावण्यांचे दोन वर्ग पडतात.
क) छावणी क्षेत्र पालिका वर्ग - 1 मध्ये आठ निर्वाचित सदस्य, तीन पद्सिद्ध सदस्य, तीन नामनिर्देशित लष्करी सदस्य, जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा (DM) एक प्रतिनिधी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होतो.
ड) सध्या (2020) भारतात 68 छावणी क्षेत्र पालिका असून कानपूर छावणी ही भारतातील सर्वात मोठी छावणी आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

9 / 15

Category: कटक मंडळे

9. कॅन्टोन्मेंट बोर्डा संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या :
अ) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.
ब) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी पाच वर्षे इतका असतो.
क)नामनिर्देशित सदस्यांचा कालावधी हा तीन वर्षे इतका असता
वरीलपैकी कोणते विधान/ने गैर लागू आहेत ?
(Forest मुख्य 2018)

10 / 15

Category: कटक मंडळे

10. भारतातील छावणी क्षेत्र पालिकेसंबंधी खालील विधान विचारात घ्या :
अ) छावणी क्षेत्र पालिका चार वर्गांमध्ये विभागल्या आहेत.
ब) वर्ग-IV छावणी क्षेत्र पालिकेमध्ये फक्त चार सदस्य निवडून येतात.
क) वर्ग-IV छावणी क्षेत्र पालिकेमध्ये नागरी लोकसंख्या ही दोन हजार पाचशेपेक्षा जास्त असत नाही.
ड) छावणी क्षेत्र पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक संरक्षण मंत्र्याद्वारे केली जाते.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

11 / 15

Category: कटक मंडळे

11. महाराष्ट्रातील कटक मंडळे असलेली ठिकाणे निवडा.
अ) पन्हाळा
ब) शिर्डी
क) औरंगाबाद
ड) देवळाली
(ASO मुख्य 2013)

12 / 15

Category: कटक मंडळे

12. कटक मंडळविषयक चुकीचे/चुकीची विधान/विधाने निवड़ा.
अ) 'कटक क्षेत्रांचे स्थानिक स्वशासन' भारतीय संविधानाच्या समवर्ती सूची मध्ये समाविष्ट आहे.
ब) कटक मंडळे ही लोकशाही स्वरूपाची यंत्रणा असून ती निर्दे शीत क्षेत्राच्या नागरी प्रशासनाशी संबंधित आहे.
क) लोकसंख्येनुसार कटक मंडळाने तीन प्रकार आहेत.
(ASO मुख्य 2019)

13 / 15

Category: कटक मंडळे

13. छावणीमंडळाच्या सदस्यांसंदर्भात अचूक विधाने ओळखा:
अ) निर्वाचित आणि नियुक्त सदस्य असतात.
ब) निर्वाचित सदस्य हे संख्येने अल्प असतात.
क) निर्वाचित व नियुक्त सदस्यांची संख्या सारखी नसते.
ड) निर्वाचित सदस्य त्यांच्यापासून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात.
(राज्यसेवा मुख्य 2013)

14 / 15

Category: कटक मंडळे

14. महाराष्ट्रातील छावणी मंडळे (कटक मंडळे) आहेत.
अ) कामठी
ब) बडनेरा
क) देवळाली
ड) खडकी
(ASO मुख्य 2017)

15 / 15

Category: कटक मंडळे

15. छावणी मंडळाची रचना, कार्ये व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे?
(राज्यसेवा मुख्य 2019)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top